तेरे येथे उपजिल्हा रुग्णालय तर येडशी येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी - आमदार राणाजगजितसिंह पाटील

तेरे येथे उपजिल्हा रुग्णालय तर येडशी येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी - आ  पाटी


 

धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - तालुक्यातील तेर येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व येडशी येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

तेर हे जवळपास ३० हजाराहून अधिक लोकसंख्येचे गाव असून सभोवतालच्या गावची बाजारपेठ आहे. या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री गोरोबा काकांचे मंदिर असून प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू व पुराणवस्तू संग्रहालय आहे. देशभरातील अनेक भाविक व पर्यटक येथे आवर्जुन येतात. त्यामुळे गाव व सभोवतालच्या गावातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रीवर्धन करून ५९ खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच येडशी हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असून बाजारपेठचे ठिकाण आहे. येथील तरल व स्थायी लोकसंख्या विचारात घेता येथे ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता होती. त्यामुळे तेर येथील उपजिल्हा रुग्णालय व येडशी येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य संचालकांना देण्यात आल्या होत्या.

या अनुषंगाने प्राप्त प्रस्तावास शासनाने मान्यता दिली असून तेर येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व येडशी येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

या दोन्ही निर्णयामुळे या गावातील व परिसरातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार असून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या निर्णयाबद्दल राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत व महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !