फळदार वृक्षांचे वाटप, वृक्षारोपण, पर्यावरण चर्चा
- Get link
- X
- Other Apps
धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे श्री भवानी योगक्षश्रम, गंधोरा यांचे विद्यमाने फळदार वृक्ष वाटप आणि वृक्षारोपण व पर्यावरण विषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अधक्षस्थानी अरविंद योगी तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्यश्री कल्याणसिंह रावत, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, डॉ अनिकेत इनामदार, सपोनि स्वप्नील लोखंडे, पोउपनि रियाज पटेल, सरपंच बबीता राठोड, दयानंद वाघमारे, गणेश चादरे, विकास सोसायटीचे चेअरमन बाबुराव भोसले,धनाजी धोतकर, अजित बरड आदी उपस्थित होते. यावेळी अतुल कुलकर्णी यांचा वृक्ष लागवड व सेंद्रिय शेतीची लोक चळवळ उभी केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कुलकर्णी, रावत, योगी यांनी मार्गदर्शन केले. तर मधुकर भोसले, सुदाम सुरवसे, रेवण साखरे, बळीराम भोसले, चंपाबाई भोसले यांना प्रतिनिधिक स्वरुपात वृक्ष वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कुलकर्णी म्हणाले की, आरोग्य चांगले ठेवयाचे असले तर सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वृक्ष लागवड देखील तितकीच महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ अनिकेत इनामदार यांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps