पोलीस अधिकाऱ्यांचा ताणतणाव दूर होण्यासाठी क्रीडा स्पर्धा आवश्यक - ओंबासे विजेत्या संघांना केले सन्मानित
पोलीस अधिकाऱ्यांचा ताणतणाव दूर होण्यासाठी क्रीडा स्पर्धा आवश्यक - ओंबासे
विजेत्या संघांचा केले सन्मानित
धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - कायदा सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या पोलिसांना सतत ताणतणाव असतो. या ताणतणावातून विरंगुळा होणे आवश्यक असते. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेणे आवश्यक असून त्यांचा ताणतणाव दूर करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धा आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दि.३० ऑगस्ट रोजी केले.
धाराशिव जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.२६ ते ३० ऑगस्ट दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील नवीन मैदानावर करण्यात आले होते. त्याचा समारोप दि.३० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ ओंबासे यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना पारितोषकांचे वितरण करून सायंकाळी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, कळंब विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, आदींसह अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ओंबासे म्हणाले की, पोलीस हे सातत्याने आपल्या कर्तव्य निभिवण्याचे काम करीत असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबियासोबत विशेषतः पाल्यासोबत खेळ खेळता येत नाहीत किंवा बाहेर जाताही येत नाही. त्यामुळे पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना खेळामध्ये प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा स्पर्धा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा स्पर्धामुळे त्यांचे मन स्वास्थ्य देखील चांगले राहण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, जिल्ह्यात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा व्हायला पाहिजेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यामधील क्रीडा स्पर्धा ला जिल्हा स्तरावरून राज्यस्तरावर सादरीकरण करता यावे यासाठी या स्पर्धा होणे आवश्यक आहेत. कारण अशा स्पर्धा झाले तर त्यांना देखील वाव मिळतो. गेल्या पाच दिवसापासून ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदविला त्या सर्वांचे आभार मानून ते म्हणाले की गेल्या वर्षी आपणाला पोलिसा मुख्यालय परिसरात मैदान नव्हते. मात्र आरपीए व त्यांच्या टीमने अतिशय मेहनत घेऊन हे ग्राउंड तयार केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच विभागीय स्पर्धा पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये धाराशिव येथे घेण्यात येणार असल्यामुळे उर्वरित मैदान तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पाल्य आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता क्रीडा ज्योत विझवून, रिट्रीट व ध्वज उतरवून करण्यात आली.
............................
हॉलीबॉल व खो-खो स्पर्धेत पोलीस मुख्यालय प्रथम तर फुटबॉल स्पर्धेमध्ये भूम कळंब उपविभाग प्रथम तसेच हॉकीमध्ये तुळजापूर उमरगा उपविभाग प्रथम तर बास्केटबॉल मध्ये धाराशिव उपविभाग प्रथम तसेच कबड्डी मध्ये तुळजापूर उमरगा उपविभाग प्रथम बाजी मारली. गोळा फेकमध्ये धाराशिव उपविभागाचे विठ्ठल गरड पुरुषांमध्ये तर महिलांमध्ये किरण बेंजरप प्रथम तसेच पोलीस मुख्यालयाचे मकसूद काझी पुरुषांमध्ये तर महिलांमध्ये विजयश्री मुंबरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पोलीस मुख्यालयातील परमेश्वर जाधवर प्रथम तर धाराशिव उपविभागाचे बीपी गोविंदवार यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये धाराशिव उपविभागाचे एन.एम. गुरव प्रथम तर पोलीस मुख्यालयाचे परमेश्वर जाधवर यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. तर ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये पोलीस मुख्यालयातील एस.बी. कोरडे प्रथम तर धाराशिव उपविभागाचे ए.एस. कोलते द्वितीय तसेच १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पोलीस मुख्यालयातील जी.एस. पठारे प्रथम व धाराशिव उपविभागाचे एच.एस. जाधवर द्वितीय तसेच ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत धाराशिव उपविभागाचे पी.डी. बोईनवाड प्रथम तर पोलीस मुख्यालयातील के.व्ही. शिंदे द्वितीय व १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये धाराशिव उपविभागाचे एम एस माळी प्रथम तर पोलीस मुख्यालयातील बी.डी. ताड द्वितीय तसेच १०० + ४ धावणे रिले पुरुष स्पर्धेमध्ये पोलीस मुख्यालयातील परमेश्वर जाधवर, एसबी कोरडे, के व्ही शिंदे मारुती माळी यांनी बाजी मारली. तर पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये पोलीस मुख्यालयातील अनिल भोसले प्रथम तर मारुती माळी द्वितीय तसेच महिला भालाफेक स्पर्धेमध्ये पोलीस मुख्यालयातील नंदिनी वडदरे प्रथम व भूम कळंब उपविभागाचे जिज्ञासा पायाळे द्वितीय तर पुरुष थाळी फेक स्पर्धेमध्ये पोलीस मुख्यालयातील दीपक लाव्हरे- पाटील प्रथम व जी.एम. विधाते द्वितीय यांनी बाजी मारली. यावेळी धाराशिव विभागाच्या संघाचे पथ संचलन संघ नायक म्हणून फरान पठाण तर पिटीधारक नंदनी वडदरे (हिरवा) तुळजापूर उमरगा विभागाचे पथ संचलन संघ नायक दत्ता थाटकर यांनी व पाटीदार म्हणून प्रतिभा मते (पिवळा) तसेच पोलीस मुख्यालयाचे पथ संंचलन संघ नायक म्हणून परमेश्वर शेंडगे व पाटीदार म्हणून किरण बेंजरेप (केशरी) तर भूम कळम विभागाचे संघ नायक म्हणून अभिजीत ढोणे व पाटीदार म्हणून सुवर्णा गिरी (लाल) यांनी भूमिका निभावली. या पथकाने पतसं चलन करीत मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी विविध खेळातील विजेता संघ, वैयक्तिक विजेते व क्रीडापटूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी प्रशस्तीपत्र व मिळत देऊन गौरविण्यात आले.