अनाधिकृत व्यक्तींकडून वजन काटे खरेदी करु नयेत

अनाधिकृत व्यक्तींकडून वजन काटे खरेदी करु नयेत

धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - गुजरात राज्याकडून वजन काट्याचे सुट्टे भाग व वजन काटे कमी दरात व कररहीत स्वरुपात महाराष्ट्र राज्यात विकले जात आहेत. त्यामुळे स्थानिक वजन काटे उत्पादक, दुरुस्तक व विक्रेते यांचे नुकसान होत आहे. विशेष बाब म्हणजे यामुळे महाराष्ट्र शासनाचा महसूल सुध्दा बुडत असल्याची तक्रार प्राप्त झाली असल्याचे महाराष्ट्र राज्याचे वैध मापनशास्त्र नियंत्रकांनी कळविले आहे.
           तसेच चीनमधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्यांची सुध्दा कमी दरात महाराष्ट्र राज्यात खुल्या बाजारात विक्री होत आहे. या वजन काट्यांना राज्य शासनाची व केंद्र शासनाची वैधानिक मान्यता नाही. वजन काटे अप्रमाणित असल्यामुळे ग्राहकांच्या हितास हानी होत आहे. अशा वजन काट्यांना अनाधिकृत व्यक्ती त्यांचे स्टिकर लावून त्यांची अनाधिकृत विक्री करत आहे. त्यामुळे ग्राहकांना माल योग्य वजनात मिळू शकत नाही. तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूलावर परिणाम होत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वजन काटे उपयोगकर्त्यांनी अशा प्रकारच्या अनाधिकृत व्यक्तीकडून वजन काटे खरेदी करु नयेत असे आवाहन लातूर व धाराशिव जिल्हा वैध मापन शास्त्राचे उपनियंत्रक स.या. अभंगे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !