पोलीस भरतीमध्ये सेवेत असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या पाल्यांना १० टक्के आरक्षण द्यावे राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशनची गृहमंत्र्यांकडे मागणी

पोलीस भरतीमध्ये सेवेत असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या पाल्यांना १० टक्के आरक्षण द्यावे

राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशनचे राज्य प्रमुख प्रमोद वाघमारे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

धाराशिव दि.७  (प्रतिनिधी) - पोलीस भरतीमध्ये सध्या पोलीसांच्या पाल्यांना ५ आरक्षण लागू आहे. परंतू सेवेत असलेले पोलीस कर्मचारी व पदोन्नतीने पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत असलेले व सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी यांच्या पाल्यांना या आरक्षणाचा कसलाही फायदा होत नाही. त्यामुळे आगामी होणाऱ्या पोलीस भरतीपासून हे आरक्षण वाढवून १० टक्के देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशनचे महाराष्ट्र संघटनेच्यावतीने राज्याच्या गृहमंत्र्याकडे एका निवेदनाद्वारे दि.७ ऑगस्ट रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पोलीसांच्या पाल्यांना सध्या जे ५ टक्के आरक्षण लागू आहे. त्यामधे ३ टक्के आरक्षण हे पोलीस कर्मचारी (PC) ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदांपर्यंत सेवानिवृत्त झालेल्यांच्या पाल्यांना मिळते. तर २ टक्के आरक्षण हे अनुकंपधारक पोलीसांच्या पाल्यांना मिळते. त्यामुळे जे पोलीस कर्मचारी सध्या पोलीस सेवेत आहेत. त्यांच्या पाल्यांना या ५ टक्के आरक्षणाचा कसलाही फायदा होत नसून हे आरक्षण फक्त पोलीस पाल्य या नावापुरतेच मर्यादित असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सेवेत असलेल्या पोलीसांच्या पाल्यांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी पसरली आहे. हे आरक्षण
१० टक्क्यापर्यंत लागू करून सेवेतील पोलीसांच्या पाल्यांना देखील याचा लाभ मिळावा अशी मागणी केली आहे.‌ विशेष म्हणजे सन २०२१ पासून महाराष्ट्राचे तात्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृह विभागकडे शिफारस करून पोलीस पदांमधील पोलीस नाईक (PN) हे पद रद्द करून पोलीस भरती झालेला पोलीस शिपाई (PC) हा १० वर्षांनंतर पदोन्नतीने पोलीस हवालदार (HC) व २० वर्षांनंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) तर ३० वर्षांनंतर पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणजेच पोलीस अधिकारी म्हणून सेवा करणार आणि पोलीस अधिकारी म्हणूनच सेवानिवृत्त होणार असल्यामुळे सध्या असलेले ५ टक्के आरक्षण लागू होत नसून त्याचा कसलाही फायदा यांच्या पाल्यांना होत नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा बारकाईने विचार करून व अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन गृहमंत्र्यांनी पोलीस भरतीमध्ये सध्या पोलीसांच्या पाल्यांना लागू असलेले ५ टक्के आरक्षण वाढवून ते १० टक्के देण्यात यावे. तसेच ते आरक्षण देताना पोलीस खात्यातील २०२१ पासून पदोन्नतीच्या पदांमध्ये केलेल्या बदलानुसार व शासन आदेशानुसार यापूर्वी पोलीस शिपाई म्हणून सेवेत कार्यरत असलेले व यापुढे सुद्धा भविष्यात पोलीस शिपाई म्हणून भरती होणारे अंमलदार हे खात्यांतर्गत पदोन्नतीने म्हणजेच १० - २० - ३० या नियमाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून सेवेत असलेले आणि त्याच पद्धतीने पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी यांच्या पाल्यांना सुद्धा १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्यासाठी तसे परिपत्रक काढून सर्व पोलीस पाल्यांना सरसकट न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे राज्य प्रमुख प्रमोद वाघमारे, शुभम कदम, इम्तियाज शेख, विजय साळुंके, शंकर राठोड, वैभव हिंगमिरे, उमेश राठोड, स्वरूप स्वामी आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !