शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम महिनाभरात सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - आ पाटील

शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम महिनाभरात सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - आ पाटी


 


धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील बहुतांश भगत पावसाने प्रचंड ओढ दिल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. खरिपातील मुख्य नगदी पिकचं अडचणीत येत असल्यामुळे शेतकरी अत्यंत  चिंताग्रस्त असून बळीराजाला दिलासा देण्यासाठी महिनाभरात अग्रीम विम्यापोटी किमान ५ रुपये प्रती हेक्टरी सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

उत्पादनामध्ये प्रचंड घट होतेय हे गृहीत धरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील निकषाच्या पुढे जाऊन या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे अनिवार्य आहे.  महिनाभरात सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. तसेच पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन मागील आठवड्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हा सनियंत्रण समितीची बैठक झाली असून २५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ११ महसूल मंडळेांचा अहवाल देण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. २१ दिवसांपेक्षा अधिकच्या पावसातील खंडामुळे जिल्ह्यातील इतर महसूल मंडळे देखील निकषाप्रमाणे अग्रीम नुकसान भरपाईसाठी अधिसूचित करण्यात येतील. यामध्ये आणखीन १३ मंडळाची भर पडली असल्याचे त्यांनी सांगितले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !