खरीप २०२३ मधील २५ टक्के अग्रीम पीक विम्यासाठी सोमवारी बैठक असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे

खरीप २०२३ मधील २५ टक्के अग्रीम पीक विम्यासाठी सोमवारी बैठक - आ. राणाजगजितसिंह  पाटील

धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात मागील  २१ दिवसांत अधिकांश भागात पाऊस न पडल्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादकतेवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. तीन आठवड्याचा खंड व नजर अंदाजाने ५० टक्क्यापेक्षा जास्त उत्पादनात घट याचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत योग्य

तरतुदीच्या अनुषंगाने पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम नियमानुसार शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. त्यामुळे या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आ राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

आ पाटील यांच्या सुचनेनुसार सोमवारी दि. २१ ऑगस्ट रोजी दु.१.३० वा. जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. खरीप २०२१ व २०२२ मध्ये याप्रमाणे २५ टक्के अग्रीम रक्कम मिळवून घेण्यात आपण यशस्वी झालो होतो. त्याच धर्तीवर ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर
पावसामध्ये तीन आठवड्याहून अधिकचा खंड पडून ५० टक्क्यापेक्षा अधिकचे नुकसान दिसून येत असेल तर २५ टक्के अग्रीमची योजनेत तरतूद आहे. जिल्ह्यातील अनेक भागात हा खंड झाल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासमवेत चर्चा करून त्यांना तातडीने बैठक आयोजित करून याबाबत विमा कंपनीला आदेश देण्याच्या सूचना केल्या आहेत. पावसातील खंडामुळे पिकांची परिस्थिती बिकट होत असून  शेतकरी चिंतातूर होत आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी २५ टक्के अग्रीम ची मागणी करण्यात आली आहे. सोमवारच्या बैठकीत याबाबत चर्चा होवून पावसातील खंड व पिकांची परीस्थिती विचारात घेवून २५ टक्के अग्रीम देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी प्रक्रिया सुरु करणे अभिप्रेत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या याबाबत काही तक्रारी असल्यास त्या लेखी स्वरुपात बैठकीत द्याव्यात, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !