सर्वसामान्य जनतेपर्यंत शासकीय योजना पोचविण्यासाठी एकदिलाने काम करा - गायकवाड
सर्वसामान्य जनतेपर्यंत शासकीय योजना पोचविण्यासाठी एकदिलाने काम करा - गायकवाड
धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - गरजू नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन शिवसेना (बाळासाहेब) चे किरण गायकवाड यांनी दि.१९ ऑगस्ट रोजी केले.
उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात शासन आपल्या दारी या अभियानाच्या अनुषंगाने उमरगा लोहारा तालुक्यात धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. याची चर्चा करण्यासाठी आयोजित पदाधिकाऱ्यांची बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, उमरगा उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील, शेखर पाटील, बालाजी पवार, राजेंद्र शिंदे पाटील लोहारा उपतालुकाप्रमुख परवेज तांबोळी संदिपान बनकर, अनंतसिंग बायस, युवा सेना तालुकाप्रमुख दत्ता मोरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, कोरोना काळात गल्लोगल्ली जाऊन शिवसैनिकांनी लोकांची मदत केली. तसेच आताही प्रत्येक घरापर्यंत जाऊन त्यांना शासनाच्या योजनांची माहिती देवून, कागदपत्रे गोळा करून त्यांना पात्र योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. आ चौगुले यांनी तालुक्यासाठी रेकॉर्ड ब्रेक निधी आणलेला आहे. त्या बळावर पुन्हा एकदा उमरगा लोहारा मतदार संघावर भगवा फडकवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत आकाश पाटील (दक्षिण जेवळी), बाळासाहेब कोकाटे (समुद्राळ) व भरत रामा मुगळे (करवंजी) यांची यांची शाखाप्रमुखपदी तर युवा सेनेच्या लोहारा उपतालुकाप्रमुखपदी महेश देवकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी तुकाराम जाधव, विलास भगत, हणमंत गुरव, संजय नंदर्गे, विनोद मुसांडे, भास्कर शिंदे, आप्पासाहेब पवार, प्रदीप शिवनेचारी, महादेव बिराजदार, माधव जाधव, शिवाजी माडीवाले, विजयकुमार भोसले, हरी भोसले, बसवराज शिंदे, सुरेश देशमुख, गहिनीनाथ सुरवसे, प्रवीण शिंदे, नितीन पाटील, सुधाकर पाटील, बालाजी जाधव, कालिदास पाटील, शरद पवार, गोविंद दंडगुले, विश्वनाथ जगदाळे, दामाजी हांडे, माधव रणखांबम, विनोद गायकवाड, नागेश पणुरे, सुरेश दंडगुले, बालाजी बिराजदार, धर्मवीर जाधव, सहदेव गोरे, कुलदीप गोरे, व्यंकट बडुरे, जितेंद्र कदम, नेताजी चव्हाण, संजय रणखांब आदी उपस्थित होते.