गोदामाचे कृषी सहसंचालक दिवेकर यांच्या हस्ते भूमिपूजन
गोदामाचे कृषी सहसंचालक दिवेकर यांच्या हस्ते भूमिपूजन
धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - स्मार्ट प्रकल्पांतर्गत पिकलॅन्ड फार्मर प्रोड्युसर कंपनीच्यावतीने कसबे तडवळे येथे गोदाम उभारण्यात येत आहे. या गोदामाचे भूमिपूजन विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी महादेव आसलकर, नोडल अधिकारी स्मार्ट अभिमन्यु काशिद, पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ चेतन जाधव, पिकलॅन्ड कंपनीचे अध्यक्ष विक्रांत पाटील, संचालक व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विभागीय कृषी सहसंचालक दिवेकर यांनी उत्कृष्ट दर्जाचे काम करण्याबाबत सल्ला दिला. तसेच सोयाबीन बिजोत्पादन व बियाणे प्रक्रिया व्यतिरिक्त भाजीपाला बिजोत्पादन, फळे भाजीपाला रोपवाटिका व प्रक्रिया यामध्येही काम करून पुढे वाटचाल करावी असे आवाहन केले.