शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पूर्णत्वासाठी लवकरच बैठक घेणार - मंत्री मुश्रीफ शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात बैठक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पूर्णत्वासाठी लवकरच बैठक घेणार - मंत्री मुश्रीफ


 शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात  बैठक


 


उस्मानाबाद दि.२७ (प्रतिनिधी) - उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा आणि इमारतीची गरज आहे. त्यासाठी लवकरच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या समवेत बैठक आयोजित करु असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने आढावा घेतांना आयोजित बैठकीत दिली.


 पुढे बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले. सध्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात हे महाविद्यालय कार्यरत आहे. आता पुढच्या वर्षांसाठी नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे महाविद्यालयास जागा कमी पडत आहे. तसेच जिल्हा रुग्णालयास होत असलेली गैरसोय पाहता  वैद्यकीय महाविद्यालयासाठी लवकरात लवकर जमीन संपादन करुन त्यावर इमारतीचे बांधकाम त्वरीत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तर त्यांनी या आढावा बैठकीत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास जागा उपलब्ध झाल्यास तात्काळ इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात येईल. त्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू देणार नाही असे नमूद केले. त्यांनी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच याविषयी वैद्यकीय शिक्षण सचिव व उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनिधीची बुधवार ३० ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक घेण्याचेही नियोजित केले. येथील वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक मनुष्यबळ व रिक्त असलेली पदे भरण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार व महाविद्यालयातील प्राध्यापकांशी चर्चा करताना त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व वैद्यकीय शिक्षण संघटनेची निवेदनेही स्विकारली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.अजय चंदनवाले, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे, अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार, उपअधिष्ठाता उज्वला गवळी, डॉ.सचिन देशमुख, प्रा.डॉ.मंगेश सेलूकर, प्रा.डॉ.सुषमा जाधव, प्रा.डॉ.सदानंद भिसे, डॉ.विश्वजीत पवार, डॉ.उदयकुमार पाध्ये, डॉ.संजय मगर, डॉ.योगेश गालफाडे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण संघटनेचे पदाधिकारी व वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !