पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारतेय नंदनवन कळंब येथे ११ हजार १११ वृक्षांची लागवड कळंबकरांना मिळणार वृक्षांची छाया
कळंब येथे ११ हजार १११ वृक्षांची लागवड
कळंबकरांना मिळणार वृक्षांची छाया
धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - पोलीस प्रशासन कळंब व सकल कळंबकरांच्यावतीने ११ हजार १११ वृक्ष लागवड करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
दि.५ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून व सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश, यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुका वृक्ष लागवड संवर्धन समिती स्थापन करुन मागील २० ते २५ दिवसांपासून पोलीस निरीक्षक कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सपोनि जगताप, कांबळे, पाटील, पोउपनि चाटे, महिला पोउपनि वर्षा साबळे यांच्यासह सर्व पोलीस अंमलदार व वृक्ष संवर्धन समितीचे सचिव आनंद बलाई, विलास पाटील, संजय देवडा, महादेव महाराज अडसुळ, बंडू ताटे, हनुमंत तांबारे, भडगे काका, निलेश पांचाळ, सर्व पत्रकार बांधव, हेल्दी ग्श्रुप, ईनरव्हिल ग्रुप, रोटरी क्लब, एहसास फॉऊडेशन, डीडीएन शुगर, एम.एच. हेल्पींग हॅन्ड, गणपतराव कथले आघाडी, व्यापारी असोसियशन, सराफ असोसियशन, नरसिंह ट्रेलर, सर्व पोलीस पाटील, शाळा महाविद्यालयातील सर्व शिक्षक-प्राध्यापक बांधव, वृक्ष संवर्धन समिती व सकल कळंबकर तसेच सर्व मदत करणारे दाते आदींनी सक्रिया सहभाग घेतला. तर अभय देशपांडे यांनीही वृक्षदींडी पूर्वी पोलीस स्टेशनमध्ये भेट देवून सहभाग नोंदविला.
दि.३ ऑगस्ट रोजी वृक्ष लागवडीत सकल कळंबकरांचा सहभाग व प्रसार होण्यासाठी कळंब शहरात वृक्षदिंडी काढण्यात आली होती. त्यामध्ये ३ ते ४ हजार सकल कळंबकरांनी सहभाग घेवून वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे महत्व व मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलांचा व लोकांचा सहभाग मुलांसाठी प्रेरणादायी ठरला. दि.४ रोजी पूर्वसंध्येपासून वृक्ष लागवडीची जयत्त तयारी करण्यात आली होती. प्रत्येक खड्याजवळ नियोजित वृक्ष ट्रि गार्ड, काळी माती, सुतळी व प्रत्येक सेक्टरमध्ये पाण्याचे टॅंकर वृक्षासाठी पोहोच करण्याची कार्यवाही पाहटेपर्यत सुरु होती. यानंतर सकाळी वृक्ष लागवडी संदर्भात घ्यावयाची काळजी व नियोजन याची माहिती शहरातील विविध रस्त्यावरुन भोंग्याद्वारे देण्यात येत होती. तर सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करुन ११.११ मिनिटांनी पूर्व नियोजनाप्रमाणे राष्ट्रगीतास प्रारंभ होवून सकल कळंबकर व आजुबाजूच्या नागरीकांनी सहभाग घेवून त्या ठिकाणी सावधान होवून सलामी दिली. विषेश म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी सोलापूर, बीड व लातूर जिल्ह्यातील काही नागरिक आले होते. सर्व सहा सेक्टरवर एकाचवेळी फटाके फोडून वेळेचे भान ठेवून इशारा देवून लागलीच हजारो हात ११ हजार १११ वृक्ष लागवडीच्या कामात मग्नं झाले. सर्व स्तरातील लोकांनी अवघ्या काही क्षणातच वृक्ष लागवड करुन वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड ब्रेक करुन हाती घेतलेले मोहिम अवघ्या काही क्षणातच फत्ते करुन मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केली. अवाहनानुसार रोपांचे ४ वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावून वृक्ष लागवड कार्यक्रम पार पडल्यानंतर वृक्षप्रेमींना इच्छेनूसार वृक्ष व त्यास लागणारे ट्री गार्ड वाटप करण्यात आले. विषेश म्हणजे अति. जिल्हा सत्र न्यायालय परिसरात अति. सत्रस न्यायाधिश आर.के. राजेभोसले, दिवाणी न्यायाधीश एन.ए. इंगळे सह दिवाणी न्यायाधीश आर.पी. बाठे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश एम.ए. शेख यांनी न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ संघटना यांनी याच कार्यक्रमाचा सहभाग म्हणून १०.३५ वाजता न्यायालयीन परिसरात वृक्ष लागवड करुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील, जिल्हा महिमा अतुल कुलकर्णी, अस्मिता सचिन ओंबासे, कैशल्य विकास विभागाचे सहा. आयुक्त संतोष राऊत, पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, नायब तहसिलदार खोंदे व कळंब पोलीस ठाणे व उपविभागाचे पोलीस अधिकारी तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैला डाके, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रावसाहेब चकोर, नॅचरल शुगरचे चेरअमन बी.बी. ठोंबरे, पर्याय संस्थेचे विश्वनाथ तोडकर, धनेश्वरी शिक्षण समुहाचे डॉ प्रताप पाटील, भुमीपुत्र वाघ, शिक्षक संघटनेचे बाळकृष्णं तांबारे, महिला समाज सेवक ज्योतीताई सपाटे, पत्रकार संघटनेचे सतिश टोणगे, व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा उपाध्यक्ष अमर चोंदे, बालाजी आडसुळ आदींसह सर्व पत्रकार, कळंब उपविभागातील सर्व पोलीस पाटील आदींच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले. या मोठ्या प्रमाणात आयोजित केलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमास पोलीस प्रशासन व सकल कळंबकर यांनी पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील यांनी आभार व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.