उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहरातील नागरी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अप) चे शहराध्यक्ष सचिन तावडे यांनी दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वात शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार - तावडे
धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहरातील नागरी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अप) चे शहराध्यक्ष सचिन तावडे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय बनसोडे, आ.विक्रम काळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी तावडे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर बोलताना ते म्हणाले की, शहरात अनेक नागरी समस्या निर्माण झालेल्या आहेत. शहरातील भूमिगत गटारीची योजना तत्कालीन आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंजूर केली होती. परंतु ही योजना योग्य पद्धतीने राबविली जात नसल्यामुळे रस्त्यावर चिखल व इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणून नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नावर चार दिवसांत उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच शहरात ज्येष्ठ नागरिकांसह बालकांसाठी सध्या अस्तित्वात असलेली परंतू नामशेष झालेली उद्याने व नवीन प्रस्तावित उद्यानांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीही पाठपुरावा करून धाराशिव शहर हे स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, महिला तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुहास मेटे, सामाजिक न्याय विभागाचे मराठवाडा अध्यक्ष अॅड.इंद्रजित शिंदे, तालुका उपाध्यक्ष बालाजी शिंदे, तालुका संघटक विवेक साळवे, आळणीचे सरपंच प्रमोद वीर, सुनील शेंडगे, असदखान पठाण, सचिन सरवदे, राजाभाऊ जानराव, विद्यार्थी आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सागर गुरव यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होेते.