कंडारी येथील १० कोटी रुपयांच्या विकास कामांचे पालकमंत्री प्रा डॉ सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन

 कंडारी येथील १० कोटी रुपयांच्या विकास कामांचे पालकमंत्री प्रा डॉ सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन


धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) -  पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते परंडा तालुक्यातील कंडारी येथे १० कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन दि.८ ऑगस्ट रोजी करण्यात आले.

      यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनंजय सावंत, दत्ता साळुंखे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे, उपविभागीय अधिकारी वैशाली शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, गट विकास अधिकारी संतोष नागटिळक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.डी. कुलकर्णी, समुदाय आरोग्य अधिकारी रूपाली शिंदे आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले की, नागरिकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.

  पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी ९ कोटी ४३ लाख रुपयांच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे, जन सुविधा योजनेअंतर्गत गावातील सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी १० लाख रुपयांच्या निधी, ५० लाख रुपयांपेक्षा जास्त निधीतून उभारण्यात येणाऱ्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्र इमारतीचे व गावातील अंतर्गत सिमेंट रस्त्यांच्या कामांचे व जन सुविधा योजने अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या आरओ प्लांटच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कंडारी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !