मध केंद्र योजनेच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करावेत
मध केंद्र योजनेच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करावेत
धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन २०१९ मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. शेतकरी व बेरोजगारांना रोजगारीची नवी संधी उपलब्ध झाली असून तो नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते. चालू वर्षासाठी मधपाळ प्रशिक्षण प्रगतशील मधपाळ (केंद्र चालक) प्रशिक्षण देण्यासाठी लक्षांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे मधकेंद्र योजनेच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करावेत असे आवाहन डी.व्ही.फताटे यांनी केले आहे.