वसंतदादा बँक घोटाळ्यातील आरोपींचा पत्रकाराला जीवे मारण्याचा प्रयत्न

वसंतदादा बँक घोटाळ्यातील आरोपींचा पत्रकाराला जीवे मारण्याचा प्रयत्न

धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या विरोधात बातम्या देत असल्याचा राग मनात धरून बँकेचे तत्कालीन चेअरमन विजय दंडनाईक, व्यवस्थापक दिपक देवकते, संचालक मंडळ व कर्मचारी हे दैनिक एकमतचे पत्रकार सुभाष कदम यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या अंगाकर गाडी घालणे, कट मारणे असे प्रकार करीत आहेत. त्यामुळे संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्ह्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने दि.२१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दैनिक एकमत जिल्हा कार्यालयात सुभाष कदम हे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वसंतदादा बँकेच्या विरोधात व फसवणूक झालेल्या ठेवीदारांच्या बाजूने अनेक बातम्या एकमतमध्ये प्रसिद्ध केल्या आहेत. बातमीची ही मालीका सुरूच आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी बँकेचे तत्कालीन चेअरमन विजय दंडनाईक, व्यवस्थापक दिपक देवकते, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या विरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे. ठेवीदारांची कशी फसवणूक झाली, चेअरमन यांनी कोट्यवधी रूपयांचे कर्ज कसे बनावट फाईली तयार करून उचलले ? त्याची परतफेड केली नाही, या संदर्भात अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
याचा राग मनात धरून अनोळखी व्यक्ती पत्रकार सुभाष कदम यांच्या दुचाकीला कट मारणे व गाडी अंगावर घालणे असे प्रकार करीत आहेत. भविष्यात त्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास वसंतदादा बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींना जबाबदार धरावे, संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावर सुभाष कदम, अनंत अडसूळ, महेश पोतदार, देवीदास पाठक, कालीदास म्हेत्रे, मच्छींद्र कदम, कैलास चौधरी, रवींद्र केसकर, प्रमोद राऊत, उपेंद्र कटके, सुधीर पवार, बालाजी निरफळ, सयाजी शेळके, मल्लिकार्जुन सोनवणे, रहिम शेख, हुंकार बनसोडे, कुंदन शिंदे, अजित माळी, सलीम पठाण, पांडुरंग मते, बाबूराव चव्हाण, रियाज शेख आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !