धाराशिव अद्यावत क्रीडा संकुल विकसित होणार - आ पाटील


धाराशिवला अद्यावत क्रीडा संकुल विकसित होणार - आ पाटील
धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या ठिकाणी जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करता यावी, यासाठी उच्च प्रतीच्या सोयी सुविधायुक्त भव्य व अद्यावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी पंधरा दिवसात प्राथमिक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी दि.२८ ऑगस्ट रोजी क्रीडा संकुला संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिल्या.

तुळजाभवानी स्टेडियमची अत्यंत दुरावस्था झाली असून या ठिकाणी शहराच्या वैभवात भर पाडणारे अद्यावत सोयी सुविधांसह नव्याने स्टेडियम उभारण्यात येणार आहे. वानखेडे व बालेवाडी सारख्या देशातील उत्कृष्ट क्रीडा संकुलाची उभारणी केलेल्या शशी प्रभू अँड असोसिएट्सचे इंजिनियर्स व आर्किटेक्ट्स लवकरच धाराशिवला येऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या क्रीडा संकुलाबाबत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी २५ कोटी रुपये निधी देण्याचे मान्य केले आहे. उर्वरित आवश्यक निधीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी देखील त्यांच्या काही सूचना असल्यास त्या लेखी स्वरुपात जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे जमा करून पोहोच घ्यावी, योग्य सूचनांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.

धाराशिव शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी वेगाने काम सुरू असून नुकतेच रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी २१ कोटी रुपये, बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी १० कोटी रुपये निधी मंजूर असून स्टेडियमचे देखील काम लवकरच मंजूर करून प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम समितीचे उपाध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, कार्यकारी अभियंता नितीन भोसले, कार्यकारी अभियंता चव्हाण, मुख्याधिकारी वसुधा फड, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ चंद्रजीत जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर, अभय इंगळे, अभिजीत काकडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंकुश पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रोहिणी आवारे, मन्मथ पाळणे, प्रविण बागल, कुलदीप सावंत, प्रविण गडदे, अजीम शेख, जावेद शेख, राजेश महाजन, मनोज पतंगे, सचिन पाळणे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, तालुका क्रीडा अधिकारी कैलास लटके, संग्राम बनसोडे, मेसा जानराव यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !