सरकारचा शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही - खा. राजेनिंबाळकर
धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - सोयाबीनचे दर, कांदा निर्यातीवरती ४० टक्के निर्यात कर व टोमॅटो आयात धोरण आदींसह विविध माध्यमांतून सरकार शेतकऱ्यांवर सतत अन्याय करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सरकारचा हा अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिला.
भूम तालुक्यातील दौऱ्या दरम्यान ते बोलत होते. पुढे बोलताना खा राजेनिंबाळकर म्हणाले की, मी सर्वसामान्य जनतेचे व गोरगरिबांची कामे तत्काळ व्हावीत या उद्देशाने लोकांचे आलेले फोन घेऊन कामे केल्यामुळे अनेकांच्या पोटात भितीचा गोळा फिरत आहे. या भिती पोटीच माझी ग्रामपंचायतची निवडणूक लढविण्याची लायकी नसल्याचे विधान केले. परंतू सन २००९ मध्ये मी लोकाशिर्वादाने विधानसभेचा आमदार होतो. विधान परीषदेचा नव्हे याचा सविस्तर विसर पडलेला आहे. तसेच माझे दिवंगत वडील यांच्यावर यापुढे कोणी टिका केल्यास त्याला समजेल अशा भाषेतच उत्तर दिले जाईल असा टोला नाव न घेता आ. राणाजगजितसिंह पाटील यांना लगावला. राजेनिंबाळकर यांनी भूम तालुक्याचा झंजावती दौरा करून विविध कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. तर भूम येथे शिवसेना (ठाकरे) च्या नूतन फलकाच्या अनावरण केले. तसेच भूम येथील एमआयडीसी भागात उभारलेल्या स्वस्त मानस व्यसन मुक्ती केंद्रास भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. तर उळूप येथे शिवसेना, युवासेना व किसान सेना यांच्या नूतन फलकाच्या अनावरणास उपस्थित राहून त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. तसेच वालवड, पाठसांगवी येथील शिवसेना युवासेना (ठाकरे) च्या नूतन फलकाच्या अनावरण करण्यात आले. तर पाटसांगवी येथे सर्व गावकरी व परिसरातील नागरिकांसाठी शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप आदी कार्यक्रमास उपस्थित राहून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच हिवर्डा येथील युवा सेनेच्या नूतन शाखेच्या फलकाचे अनावरण तर ईराचीवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्ती सोहळ्यास उपस्थित राहून गावकऱ्यांशी संवाद साधला. तसेच नागेवाडी येथील नागरिक साथीच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्या ठिकाणी उपचार व तसेच प्रतिबंधात्मक उपाय आदीची माहिती जाणून घेतली. तर झेंडेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारंभास उपस्थित राहून गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच बेलेश्वर येथे श्रावण मासानिमित्त आयोजित केलेल्या सप्ताहास उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे, तालुकाप्रमुख श्रीनिवास जाधवर, जिल्हा प्रमुख मेघराज पाटील, नेत्र रोग तज्ञ बाळासाहेब घेंबाड, विधानसभा समन्वयक दिलीप साळू, शहरप्रमुख प्रकाश अकरे, महिला आघाडी तालुकाप्रमुख उमाताई रणदिवे, माजी तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, विधानसभा युवा अधिकारी प्रल्हाद अडागळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव, युवासेना तालुकाप्रमुख सुधीर ढगे, शहरप्रमुख अविनाश जाधव, उपतालुकाप्रमुख रामभाऊ नाईकवाडी, अब्दुल सय्यद, केशव चव्हाण, अविनाश गटकळ, राजाभाऊ नलावडे, रफिक तांबोळी, सुबुगडे काका, नाईकवाडी, शंकर गपाट, सदानंद जोगदंड, बाळासाहेब वरळे, हनुमंत सानप, तात्या कांबळे, अमोल वनवे, आकाशराव शेळके, संभाजी नाईकनवरे, बाबा नाईकदी, सुजित गोरे, सागर मुंडे, महेश मुंडे, अशोक पन्हाळे, शेखर वाघमारे, विजय पन्हाळे, अशोक सपकाळ, जयराम गायकवाड, बंकट देवरे, लिंबराज गपाट, अशोक साळुंखे, प्रमोद भोसले, अशोक माने, चंद्रकांत चव्हाण, जावेद तांबोळी, बळीराम गटकळ, विनोद रेडे, संतोष हराळ आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, शिव सैनिक, युवा सैनिकांनी मोठा सहभाग नोंदविला.