महिलांच्या कलेला वाव मिळावा यासाठी मंगळागौरी स्पर्धा - पाटील एक लाख रुपयांची बक्षिसे

महिलांच्या कलेला वाव मिळावा यासाठी मंगळागौरी स्पर्धा  - पाटील

एक लाख रुपयांची बक्षिसे

धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील महिलांना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्यात असलेल्या कलागुणांना वाव मिळावा. तसेच त्यांना व्यक्त होऊन सार्वजनिक जीवनाचा आनंद लुटता यावा यासाठी खास महिलांसाठीच मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन दि.२९ ऑगस्ट रोजी करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष तथा क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२३ ऑगस्ट रोजी दिली.
धाराशिव येथील प्रतिष्ठान भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की, आमच्या घरी पूर्वीपासून मंगळागौरी सणानिमित्त महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात होते. यंदा मी त्यामध्ये थोडासा बदल केला असून मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये महिलांना पारंपारिक व आधुनिक गाणी सादर करण्यासह त्यांना नृत्य देखील करता येणार आहे. एका गटामध्ये कमीत कमी १० महिला तर जास्तीत जास्त २० महिला सहभागी होऊ शकतात. मात्र युवतींनी त्यांचे स्वतंत्र गट तयार करून आपली कला सादर करावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच आपल्या गाण्यामधून समाजामध्ये चांगला संदेश जावा व महिलांना देखील व्यक्त होता यावे हा या पाठीमागचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. या स्पर्धेमध्ये महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस देखील ठेवण्यात आलेली आहेत. प्रथम प्रथम येणाऱ्या संघास ५० हजार रुपये तर द्वितीय येणाऱ्या संघास ३० हजार रुपये व तृतीय येणाऱ्या संघास २० हजार रुपये तसेच बार्शी, सोलापूर व कोल्हापूर या ठिकाणाहून देखील काही महिलांचे संघ सहभागी होणार असून त्यांच्यासा

ठी वेगळी बक्षीसे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच...बाईपण भारी देवा... हा चित्रपट महिलांना माझ्या वाढदिवसानिमित्त मोफत धाराशिव तुळजापूर व कळंब या ठिकाणच्या चित्रपटगृहांमध्ये दाखविला. ज्या महिलांनी आजपर्यंत चित्रपटगृहात येत तीन तास चित्रपट पाहिला नाही अशा महिला देखील या चित्रपट पाहण्यासाठी आल्या त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच माझ्यासाठी खरी सुखद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम धाराशिव येथील लेडीज क्लबच्या मैदानावर दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होणार असून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिला संघाने सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन पाटील यांनी केले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !