लोहारा तालुका दुष्काळ जाहीर करण्याची ठाकरे शिवसेनेची मागणी
लोहारा तालुका दुष्काळ जाहीर करण्याची ठाकरे शिवसेनेची मागणी
लोहारा दि.२५ (प्रतिनिधी) - तालुका दुष्काळ जाहीर करुण शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे) च्यावतीने शहरात आंदोलन करण्यात आले.
लोहारा तालुक्याची अर्थव्यवस्था ही जवळपास शेतकरी वर्गावरच अवलंबून आहे. लोहारा तालुक्यात गेल्या २५ ते ३० दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. यावर्षी मान्सून उशीरा आल्यामुळे पेरण्याही उशिरा झाल्या. परंतू पेरण्या झाल्यानंरत पावसाने पुन्हा एखदा खंड दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे, खत व शेतात केलेली मेहनत वाया गेली आहे. यासह पशुसांठी चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी दु:खी व कष्टी होऊन आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे शासनाने लोहारा तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, २१ दिवस पावसाने खंड दिल्यामुळे पीक विमा कंपनीने २५ टक्के अग्रीम रक्कम द्यावी. तसेच कांद्यावरील जाचक असणारे ४० टक्के निर्यात शुल्क कमी करावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करावी, शेतीसाठी सगल १२ तास उच्च दाबाने दिवसा लाईट द्यावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण लाईट बील माफ करण्यात यावे. तसेच पशुधनाची मोजणी करुन पशुधनासाठी मोफत चारा उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक दिपक जवळगे, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलिम शेख, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते राजेंद्र कदम, विरपक्ष स्वामी, शिवदुत महेबुब गंवडी, मार्डीचे सरपंच श्रीमंत पाटील, रेबे चिंचोलीचे उपसरपंच पवन मोरे, नितिन सुर्यवंशी, हाराळीचे उपसरपंच दत्तात्रय पाटील, युवासेना शहरप्रमुख दिनेश गरड, शाखाप्रमुख दत्ता पाटील, महेश चपळे, बळीराम गोरे, अनिल मोरे, श्रीकांत कांबळे, चेतन गोरे, कुलदीप बडुरे, रघुवीर घोडके, आकाश जावळे, काशिनाथ गोरे, शहबाज सय्यद, आनंद रोडगे, किशोर भालेराव, पद्माकर गुळवे, हनुमंत माळी, लक्ष्मण सुर्यवंशी, मारुती फुलसुंदर, राजेंद्र कदम, संजय कोठार, पळसे राजेंद्र, जे.डी. शिरसाट, हनुमंत मोगळे, आकाश जाधव, शुभम साळुंखे, काकासाहेब मुळे, कमलाकर बिराजदार, राजेंद्र सुर्यवंशी, अनंत घोडके, हनुमंत बनसोडे, बिभीषन नरगळे, सुरेंद्र जाधव, दिनकर नरगळे, विशाल बडुरे, बापुसाहेब ढोणे, राशीद फकीर, संतोष जावळे, दत्तात्रय पाटील, पुरुषोत्तम सितापुरे, रविंद्र भोंडवे, राजकुमार मोरे, पांडुरंग कुंभार, अप्पू स्वामी, लक्ष्मण डिग्गीकर, नागनाथ मदने, नागेश थोरात, रामराव चव्हाण, रमेश जाधव, सतीश राठोड, रघुनाथ राठोड यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.