राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव पठाण यांनी केली उपमुख्यमंत्री पवार यांच्याबरोबर चर्चा

राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव पठाण यांनी केली उपमुख्यमंत्री पवार यांच्याबरोबर चर्चा

धाराशिव दि. २१ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव खालील पठाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील देवगिरी शासकीय निवासस्थानी भेट घेऊन अल्पसंख्या विभागाचे काम वाढविण्यासाठी दि.२१ ऑगस्ट रोजी सविस्तर चर्चा केली. यावेळी अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणावे. तसेच उद्योगधंदे सुरू करता यावेत यासाठी कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण देऊन अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी व तरुणांना उद्योजक बनवावे यासह इतर विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन याबाबत निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसीम बुरहान यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !