मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार - शिंदे जिल्ह्यातील प्रत्येक गावातील माती कलशांमध्ये दिल्लीला नेण्यात येणार विविध प्रकारच्या ७५ वृक्षांची लागवड करण्यात येणार
मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार - शिंदे
जिल्ह्यातील प्रत्येक गावातील माती कलशांमध्ये दिल्लीला नेण्यात येणार
विविध प्रकारच्या ७५ वृक्षांची लागवड करण्यात येणार
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत ऑगस्टमध्ये ग्रामीण भागांसह शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यासह प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शिलाफलक लावून त्यावर देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांची नावे व प्रधानमंत्री यांचा संदेश कोरला जाणार आहे. तसेच प्रत्येक गावची माती कलशमध्ये भरून ८ तालुक्यातील ८ कलश व ८ युवक दिल्लीला पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.४ ऑगस्ट रोजी दिली.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात कोणकोणते उपक्रम राबविण्यात येणार याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील माती कलशांमध्ये गोळा करण्यात येणार आहे. ही माती प्रत्येक तालुक्यातील युवक तो कलश घेऊन दिल्लीला जाणार आहेत. ही या कलशातील माती दिल्ली येथे ७५ अमृत वाटिका तयार करून त्यामध्ये विविध प्रकारच्या ७५ देशी वृक्षांची लागवड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दि. ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान गावातील संस्मरणीय एका ठिकाणी अमृत सरोवर, शाळा व ग्रामपंचायत याठिकाणी शिला फलकाची उभारणी करण्यासाठी माहिती देण्यात येणार आहे. तर वसुधा वंदनमध्ये गावातील योग्य ठिकाणी ७५ देशी वृक्षांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात यावी. तसेच ज्यांनी देश, स्वातंत्र्य व सुरक्षेसाठी बलिदान केलेले आहे अशा निवृत्त वीरांचा, आर्मी, पोलीस दल व स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्यांचा शाल बुके व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात यावा. तर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. दि.१६ ते २० ऑगस्ट दरम्यान प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशांमध्ये गोळा करून त्या कशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव लिहिण्यात यावे. यासाठी लोकप्रतिनिधी युवक मंडळ महिला बचत गट शेतकरी मंडळ व नागरिकांचा सहभाग घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच हा कलश २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील एका युवकांची निवड नेहरू युवा केंद्र, युवक कल्याण विभाग करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
.......................................
जीवनाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी जगणे हीच स्वातंत्र्यसैनिकांना आपली खरी आदरांजली असेल असा प्रधानमंत्री याचा संदेश ग्रॅनाईट दगडाच्या शिला फलकावर कोरण्यात येणार आहे.
.......................................
मी अशी शपथ घेतली आहे की, भारताला विकसित देश बनवायचं आहे. तसेच २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचं स्वप्न साकार करायचा आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावायचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे, अशी शपथ
नागरिकांनी घ्यायची आहे.
...............................
या उपक्रमाची माहिती, मातीचे दिवे घेऊन त्यामध्ये ज्योत पेटवून फोटो, सेल्फी तालुका नोडल अधिकारी यांच्या लॉगिनमधून https://Yuva.gov.in/meri_matti_mera_desh या पोर्टलवर अपलोड करायचे आहेत.