उस्मानाबाद येथील बॅंक घोटाळ्यात ४७ कोटी ७८ लाख रुपयांचा महाघोळ ‌ वसंतदादा नागरी सहकारी बँकेतील प्रकरण

वसंतदादा नागरी सहकारी बँकेत ४८.७८ कोटीचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार


धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या तत्कालिन चेअरमन, व्यवस्थापक, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार करून कोट्यवधी रूपयांचे कर्ज पुरेशे तारण न घेता जवळच्या लोकांना वाटप केले. वाटप केलेल्या कर्जास ९ वर्षे झाली. मात्र वसुली केली नाही. बँकेचे तत्कालिन चेअरमन, त्यांचे जवळचे नातेवाईक, संचालक यांच्या नावे नियमबाह्य पद्धतीने कोट्यावधी रूपयांचे ओव्हर ड्राप टाकून पैसे उचलले. रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणी अहवालात ४८ कोटी ७८ लाख रूपयांचे व्यवहार बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. बँकेची एकूण आर्थिकस्थिती पाहून रिझर्व्ह बँकेने वसंतदादा नागरी बँकेचा बँकींग परवाना रद्द केला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी, नागरिक, नोकरदार, व्यवसायिक, सेवानिवृत्त कर्मचारी वसंतदादा बँककडे वळले. कालांतराने वसंतदादा बँकेचे खातेदार, ठेवीदार मोठ्या संख्येने वाढले. ठेवीदारांनी मोठ्या विश्वासाने लाखो, करोडो रूपयांच्या ठेवी वसंतदादा बँकेत ठेवल्या. बँकेच्या ठेवी ८० कोटीच्या जवळपास पोहचल्या होत्या. परंतु बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक, व्यवस्थापक दीपक देवकते, संचालक मंडळ व कर्मचाºयांनी कोणताही विचार न करता चेअरमनच्या जवळचे नातेवाईक, कार्यकर्ते, स्वत:च्या जयलक्ष्मी खाजगी साखर कारखान्यातील कर्मचारी, पतसंस्थेतील कर्मचारी यांना पुरेशे तारण न घेता लाखो रूपयांचे कर्ज वाटप केले. कर्जवाटप करून ९ वर्षाचा कालावधी लोटला. तरी त्या कर्जाची वसुली केली नाही. बँकेतील अनेक खातेदारांच्या बचत खात्यावर लाखो रूपयांचे ओव्हर ड्राफ दिले. दिलेल्या रक्कमेवर व्याजही घेतले नाही. चेअरमन विजय दंडनाईक यांच्या बँकेतील चालू खात्यावर आॅक्टोबर २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत १ कोटी २८ लाख १७ हजार रूपयांचा ओव्हर ड्राफ दिला. एप्रिल २०१३ ते २१ फेब्रुवारी २०१४ या कालावधीत १ कोटी २८ लाख १७ हजार रूपयांचा ओव्हर ड्राफ दिला. संचालकाच्या बचत खात्यावर २२ एप्रिल २०१४ ते १४ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत ७ लाख ७४ हजारांचा ओव्हर ड्राफ दिला. अन्य दुसºया एका संचालकाच्या बचत खात्यावर ७ लाख ७६ हजाराचा ओव्हर ड्राफ, चेअरमनच्या कंपनीच्या खात्यावर १९ लाख ८८ हजाराचा ओव्हर ड्राफ, चेअरमनच्या भावाच्या व पत्नीच्या खात्यावर ३ लाख ७ हजाराचा ओव्हर ड्राफ, तपासणी अहवालात सरासरी ४० लाख २० हजार रूपये बिगर तारण अ‍ॅडव्हांस, १० फेब्रुवारी २०१४ रोजी बँकेने सहा कर्जदारांना प्रत्येकी ६० लाख रूपये ३ कोटी ६० लाख रूपयांचे ओव्हर ड्राफ दिले. सदर ३ कोटी ६० लाख रूपये रक्कम त्याच दिवशी कर्जदाराच्या खात्यावरून चेअरमन विजय दंडनाईक यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.
वसंतदादा बँकेने १९ लाख ८८ हजार रूपयांचा ओव्हर ड्राफ चेअरमनच्या चालू खात्यावर दिला. बँकेने चेअरमनच्या पत्नीच्या नावे १० नोव्हेंबर २०१७ रोजी १३ लाख १२ हजारांचा ओव्हर ड्राफ दिला. बँकेच्या काही खातेदारांना कोणतेही तारण न घेता व कोणतीही कागदपत्रे न घेता ४३ लाख ५२ हजार रूपयांचा ओव्हर ड्राफ दिला. वसंतदादा बँकेने ३ कोटी १० लाख रूपयांचा बिल्डींग व गंगाजळी व्यवहारात वापरला. बँकेने एसएलआर मेंटेन न केल्याने १५ लाख १६ हजाराचा दंड भरला. पुर्वीच्या तपासणी अहवालात ७ थकीत कर्जदारांची खाती बंद करून त्यांना नवीन ३ कोटी ८५ लाखाचे कर्ज वाटप केले. या कर्ज वाटपाचे रेकॉर्ड बँकेने तपासणीवेळी उपलब्ध करून दिले नाही. बँकेने चेअरमनच्या पत्नीच्या नावे २ लाख २८ हजार रूपये बिगर तारण अ‍ॅडव्हांस दिला. त्याचे रेकॉर्ड उपलब्ध नाही. ३१ मार्च २०१६ अखेर बँकेने बिगर तारण अ‍ॅडव्हांस ४६ लाख ५ हजारांचे दिले. ३ आॅगस्ट २०११ रोजी ११ खातेदारांना प्रत्येकी ६० लाख रूपये, असे  एकूण ६ कोटी ६० लाख रूपयांचा बिगरतारण अ‍ॅडव्हांस दिला. १५३१ खातेदारांना ८ कोटीचे ६१ लाखाचे कर्जवाटप, २००८-२००९ या आर्थिक वर्षात तपासणीवेळी ७० लाख रूपयांची कॅश कमी दिसून आली. १३ खातेदारांचे नुतनीकरण करून २ कोटी ३ लाख ५० हजाराचे कर्ज वाटप केले. बँकेने १२८२ खातेदारांना ८ कोटी ८८ लाखाची कॅश क्रेडीट सवलत दिली पण ती बँकेच्या संगणक प्रणालीत सीबीएस मध्ये दिसून आली नाही. बँकेच्या कर्मचाºयांनी बिगर परवानगी २० लाख ६२ हजाराची उचल घेतली. बँकेने करून घेतलेली ६ लाखाची प्रिटींग निनावी दुकानदाराच्या नावे आहे. एप्रिल २०१६ ते नोव्हेंबर २०१६ बँकेने एसएलआर मेंटेन न केल्याने १८ लाख २ हजाराचा बँकेला दंड बसला. बँकेने १३ खातेदारांना ७ कोटी ४५ लाखाचे विनातारण कर्ज वाटप केले. त्या कर्जाच्या व्याजाची वसुली केली नाही. बँकेची तपासणी केलेल्या वर्षात ८३ लाख ७८ रूपयांचे बिगर तारण कर्ज वाटप केले. बँकेने कर्ज दिलेल्या कर्जदारांपैकी २०० कर्जदारांवर, त्यांची कर्ज रक्कम ९ कोटी ४२ लाख रूपये असून बँकेने या २०० कर्जदारांवर काहीच कारवाई केली नाही. रिझर्व्ह बँकेने वसंतदादा बँकेची तपासणी केल्यानंतर त्यांना या बँकेने ४८ कोटी ७८ लाख रूपयांचे आर्थिक व्यवहार नियमबाह्य व बेकायदेशीर वाटले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने वसंतदादा बँकेवर परवाना रद्दची टोकाची कारवाई केल्याचे दिसून येत आहे.
.....................................................


रिझर्व्ह बँकेने वसंतदादा नागरी बँकेचा बँकींग परवाना रद्द केल्यानंतर राज्याच्या सहकार आयुक्तांनी बँकेवर     सहाय्यक निबंधकांची अवसायक म्हणून नेमणूक केली. अवसायकांनी डीआयसीजीसीच्या नियमाप्रमाणे ठेवीदारांच्या ५ लाखापर्यंतच्या ठेवी ठेवीदारांना परत केल्या. तर ५ लाखांवरील ठेव ठेवणाऱ्यांना ठेवीदारांचे १८ कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम देणे बाकी आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी बँकेने कर्जाची कडक वसुली करणे आवश्यक होते. परंतू बँकेच्या कर्मचाऱ्यानी सोयीस्करपणे वसुलीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ठेवीदारांच्या ठेवीच परत देता आलेल्या नाहीत हे ठेवीदारांचे दुर्दैव तर संबंधित घपळेबाजांचे सुदैव म्हणावे लागेल.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !