माजी आमदार राहुल मोटे यांनी आजपर्यंत विकास निधी का आणला नाही - सावंत


माजी आमदार राहुल मोटे यांनी आजपर्यंत विकास निधी का आणला नाही - सावंत
     
परंडा दि.२२ (प्रतिनिधी) - तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखाना उभा करताना तो उभा होऊ नये यासाठी आम्हाला फार त्रास दिला. तसेच आमचा विकास झालेला त्यांना बघवत नसल्याचे सांगत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्यावर आयोजित पत्रकार परिषदेत दि.२२ ऑगस्ट रोजी तोफ डागली.

परंडा येथील सद्धीवाल कॉम्लेक्समध्ये शिवसेना (बाळासाहेब) संपर्क कार्याल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य प्रा गौतम लटके, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णा जाधव, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सध्दीवाल, जाकीर सौदागर, संजय निराधार समितीचे अध्यक्ष जयदेव गोफणे,  शिवसेनेचे युवा तालचकाध्यक्ष राहुल डोके, सतीश मेहेर, युवा शहर प्रमुख वैभव पवार, आरोग्य विभागाचे तालुकाप्रमुख बालाजी नेटके, नवनाथ बुरंगे, मदनसिंह सद्घीवाल आदी उपस्थित होते. पुढे बोलताना सावंत म्हणाले की, माजी आमदार राहुल मोटे यांनी २५ वर्षात घरात अमदारकी असताना मतदार संघाचा विकास का केला नाही ? असा प्रश्न विचारीत आम्ही ४ वर्षात मतदार संघात शेकडो कोटी निधी आणला. मात्र त्यांनी २५ वर्षात तेवढा निधी आणला का ? ते खानदानी राजकारणी आहेत. तर आमचे वडील व अजोबा हे शेतकरी होते. प्रा डॉ तानाजीराव सावंत मंत्री झाल्यापासून मतदार संघात भरपूर निधी आणून मतदार संघात विकास होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच हे विरोधकाच्या म्हणजे माजी आमदार मोटे यांच्या डोळयात खुपत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मोटे यांनी त्यांचा आमदारकीच्या काळात हप्ते घेत होते असा गंभीर आरोप त्यांनी केला.  

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !