उमरगा तालुक्यात मिड - डे सर्वेक्षणास सुरुवात
उमरगा दि.२४ (प्रतिनिधी) - सध्या महाराष्ट्रात २३ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून मिड सीजनचा पीक विमा लागू करू शकतात. अशा वेळी अधिसूचना काढलेल्या महसूल मंडळात शेतकऱ्यांना पीक नुकसानीची पूर्व सूचना देण्याची गरज नाही. तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी वैयक्तिक पीक नुकसानीची पूर्व सूचना देऊ नये, कारण ती ग्राह्य धरण्यात येत नाही. फक्त जिल्हाधिकऱ्यांमार्फतच अधिसूचनाद्वारे मध्य हंगाम ( mid season) चा पीक विमा लागू होतो.
यामुळे उमरगा तालुक्यातील कृषी मंडळात सोयाबीन पिकांचे सर्वेक्षण करून पीक विमा योजनेतर्गत ५० टक्के नुकसान भरपाई मूल्यांकनासाठी कृषी सहाय्यक व विमा कंपनी प्रतिनिधी यांच्यामार्फत संयुक्त सर्वेक्षण करण्यात येत आहे. जकेकूर येथे कृषी सहाय्यक जी.बी. शेख, कृषी पर्यवेक्षक एन.व्ही. फडणीस, मंडळ कृषी अधिकारी ए.बी. पटवारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.