BRS Parties celebration in Osmanabad Telangana C.M. KCR Rao declared farmer karj mafi

तेलंगणातील बीएसआर सरकारने शेतकऱ्यांचे १९ कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचा जल्लोष

उस्मानाबाद दि.३ (प्रतिनिधी) - तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समितीचे मुख्यमंत्री केसीआर सरकारने शेतकऱ्यांचे थकीत असलेले १९ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा दि.३ ऑगस्ट केली आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडीत शेतकरी हिताच्या निर्णयाचे स्वागत करीत दि.३ ऑगस्ट रोजी जल्लोष साजरा केला.

तेलंगणातील सरकारने शेतकऱ्यांचे १९ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा करताच केसीआर यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश सुकाणू समिती, भारत राष्ट्र समितीच्या आदेशानुसार, धाराशिव जिल्ह्यातील भारत राष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांचे योग्य नियोजन, प्रचंड राजकीय इच्छाशक्ती व अहोरात्र मेहनत या त्रिसूत्राने तेलंगणा राज्याचे नंदनवन बनले आहे. तेथील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता यांच्या जिवनात आमूलाग्र अशी क्रांती झाली आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्याला हक्काचा विमा देखील मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांकडे खेटे मारावे लागतात पण पदरी मात्र घोर निराशाच पडते. तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या योजना, तेलंगणाचे विकासाचे मॉडेल हे महाराष्ट्रात  देखील राबविले जावे यासाठी भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करतील आणि केसीआर यांचे नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशाला सुद्धा खुप गरजेचे असल्याचे मत अर्चनाताई अंबुरे यांनी व्यत केले.
त्यावेळी भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक ॲड.रुपेश माडजे, फुलचंद गायकवाड, गौस मुलानी, निखिल चांदणे, अभिषेक भिसे, सूरज लोंढे, ऋषिकेश मगर, संतोष मोरे, बालाजी सगट, विशाल देवळकर, सुरज कांबळे  पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !