शासनाच्या सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ घ्यावा - कोळगे
शासनाच्या सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ घ्यावा - कोळगे
धाराशिव दि.३१ (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या बाल संगोपन योजनेतंर्गत जिल्ह्यामधील अनाथ, निराश्रीत, दुर्धर आजारी पालकांची, कैद्यांची, पालकांचा पत्ता लागत नसलेली, एकल पालक, परित्याग, मातृत्व गंभीर, पालक रुग्णालयात असणे, ताणतणाव, न्यायालयीन वाद, कौटुंबिक संकटात असलेली, कुष्ठरुग्ण, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदयाची, एचआयव्ही ग्रस्त, ४० टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेली अंध, दिव्यांग, मागणारी पोक्सो अंतर्गत बळी पडलेली तीव्र कुपोषित बालके, आजार व्यसनाधीन कोविडमधील एक पालक नसलेली नैसर्गिक आपत्तीमध्ये पालक, बालविवाहाला बळी पडू शकणारी व विधी संघर्षातील आशा प्रकारच्या बालकांसाठी दर महिना शासन २२५० रुपये बालकांच्या खात्यावर टाकणार आहे तरी धाराशिव जिल्ह्यातील या योजनेत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्कप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी व अधिक सविस्तर माहितीसाठी शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे पतसंस्था, पोलिस लाईन समोर ग्रीन लॅन्ड स्कुल रोड धाराशिव फोन - ०२४७२ - २२२२२० मो- ९४२२४६६९९५ तसेच ७०२०८५५७३० या व्हाट्सअप नंबरवर तातडीने आशा बालकांची नावे दि.३ सप्टेंबरपर्यंत पाठवावीत असे आवाहन कोळगे यांनी केले आहे.