किसन माने यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ‌‌ मराठा आंदोलकांनी कार पेटवली

किसन माने यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

मराठा आंदोलकांनी कार पेटवली

उमरगा दि.७ (प्रतिनिधी) -  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील माडज येथील एका युवकाने गावातील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यानंतर गावात तणावाचे वातावरण होते. गुरुवारी  सकाळी शव विच्छेदन झाल्यानंतर प्रेत टेम्पोमधून आणून उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयासमोर श्रद्धांजली वाहण्यात आली. याचवेळी काही तरुणांनी शासकीय विश्रामगृहासमोर एक कार पेटवून दिली. दरम्यान शहर व तालुक्यात आजही कडकडीत बंद पाळण्यात आला.
         गावातील तरुण किसन चंद्रकांत माने (वय ३५ वर्षे) याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे व आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्यासाठी मी जीव देत आहे असे म्हणत गावातील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न निष्पळ ठरला. त्यानंतर ग्रामस्थांनी आरक्षणाबाबत लेखी हमी दिल्याशिवाय शव विच्छेदन करणार नाही अशी भूमिका रात्री उशिरापर्यंत घेतली होती. त्यामुळे गावात तणावाचे चे वातावरण होते. तर दि.७ सप्टेंबर रोजी सकाळी माडज गावातील ग्रामस्थांनी मृतदेह एका टेम्पोमधून उपजिल्हा रुग्णालयास शव विच्छेदनासाठी आणला. यावेळी तरुणांनी मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी केली. तर अनेकांनी आरक्षणावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर हा टेम्पो शहराच्या प्रमुख मार्गावरून उपविभागीय कार्यालयात आणून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर काही क्षणातच मराठा तरुण आक्रमक होऊन शासकीय विश्रामगृहासमोर कार क्र. एमएच १२  सी डी ८०५८ या गाडीला पेटवून देण्यात आले.  तात्काळ अग्निशामक गाडी आली. मात्र तोपर्यंत ही कार अर्धवट अवस्थेत पेटली होती. तहसील कार्यालयासमोरही श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शहरातून रॅली काढण्यात आली. खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठा आरक्षणाबाबत संसदेत आवाज उठवणार असल्याचे सांगत शांततेचे आवाहन केले.
         यावेळी आ ज्ञानराज चौगुले, शिवसेनेचे बाबा पाटील, किरण गायकवाड, सुरेश बिराजदार, कैलास शिंदे, दिलीप भालेराव, संजय पवार, बसवराज वरनाळे, बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, बाबुराव शहापुरे, बळी सुरवसे, विजयकुमार नागणे, सुधाकर पाटील, विनायकराव पाटील आदी विविध संघटनांचे पदाधिकारी मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या घटनेमुळे शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. एसटी वाहतूक पूर्णता बंद होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी माडज येथे जाऊन माने कुटुंबियांचे सांत्वन केले.

गुरुवारी सकाळपासूनच उमरगा शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. बंदोबस्तासाठी मोठा पोलीस फौज फाटा मागवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ,अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक डी.बी. पारेकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यातील व परिसरातील हजारो युवकांच्या उपस्थितीत किसन माने यांच्यावर माडज येथे दुपारी  २.३० अंत्यसंस्कार करण्यात आले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !