अर्चनाताई पाटील यांनी काढली महिलांची जोतिर्लिंग घृष्णेश्वर दर्शन सहल
अर्चनाताई पाटील यांनी काढली महिलांची जोतिर्लिंग घृष्णेश्वर दर्शन सहल
धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - श्रावण मासानिमित्त आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्यावतीने जोतिर्लिंग घृष्णेश्वर दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती.
ही दर्शन यात्रा दि.१२ सप्टेंबर रोजी कळंब येथून पहाटे निघाली होती रात्रीपर्यंत या महिलांनी या सहलीचा आनंद लुटला. कळंब शहरातील छत्रपति शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून सहलीची सुरुवात झाली. श्रावण महिन्यानिमित्त यावेळी कळंब तालुक्यातील भाविक महिलांना बारा जोतिर्लिंगापैकी एक तीर्थक्षेत्र श्री घृष्णेश्वर देवस्थान येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली होती. तालुक्यातील मोहा, मंगरूळ, येरमाळा, ईटकूर, डिकसळ, शिराढोण, नायगाव आणि खामसवाडी या जिल्हा परिषद गटास एक बस या प्रमाणे ८ व सीआरपी, आशा वर्कर्स, आदींसाठी १ बस या प्रमाणे ९ बसेसची सोय करण्यात आली आहे.
घृष्णेश्वराचे दर्शन झाल्यानंतर शेकडो महिलांसह नजीकचे जागृत देवस्थान असलेल्या श्री भद्रा मारुतीचे घेतले. यामुळे महिलांचा आनंद द्विगुणित झाला. या सहली निमित्त महिलांची हितगुज करताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, देवदर्शन एक निमित्त आहे, देवदर्शन आपण आपल्या गावात सुद्धा करू शकतो. पण महिलांना कधीही घराच्या बाहेर पडून स्वतःसाठी आनंद घेता येत नाही. त्यामुळे मी दरवर्षी अशा सहलीचे नियोजन करते. आणि त्यानंतर महिलांमधून ज्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येतात, त्या जो आनंद घेतात, त्यामुळे माझा स्वतःचा आनंद द्विगुणीत होऊन पुन्हा पुन्हा अशा सहलीचे नियोजन करावे असे माझ्या मनामध्ये सतत येत राहते. यंदाच्या या ट्रीपला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आम्ही स्वतः सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात महिला घेतल्यामुळे सांशक होतो की महिला कसा प्रतिसाद देतील, परंतु महिलांनी इतका सुंदर या सहलीचा आनंद लुटला कुठल्याही प्रकारे गालबोट न लागता निर्विघ्नपणे महिलांना सुखरूप घरी सोडल्याचे माझ्या मनामध्ये समाधान आहे. अशीच गेल्या मंगळवारी तुळजापूर तालुक्यातील महिलांसाठी श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर दर्शन सहल काढण्यात आली होती. त्यालाही असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
या सहलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनीही अर्चनाताईच्या माध्यमातून आपल्याला सहलीचा पहिल्यांदाच आनंद घेता आला व आपण सहल कशी असते ? हे पाहिल्याचे जाणीवपूर्वक नमूद केले. यावेळी घृष्णेश्वर देवस्थान प्रशासनाच्यावतीने श पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.