वाशी तालुक्यात दूध भेसळ रोखण्यासाठी ३९ तपासणी केंद्रांची स्थापना - शिंदे नोंदणी व नूतनीकरण नसलेली ३ दुकाने केली बंद

वाशी तालुक्यात दूध भेसळ रोखण्यासाठी ३९ तपासणी केंद्रांची स्थापना - शिंदे

नोंदणी व नूतनीकरण नसलेली ३ दुकाने केली बंद

धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - दुधात मोठ्या प्रमाणात होणारी भेसळ रोखण्यासाठी व दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत मिळावा तसेच दुध भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाला आळा घालून  नागरिकांना स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने दुध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे.

             पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दुधातील भेसळ तपासणीची धडक मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील दुध भेसळ रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दुध भेसळ समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी जिल्ह्यात दुध भेसळ रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, वैधमापनशास्त्र विभाग तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे समन्वय साधून जिल्ह्यात संयुक्तीक कारवाई करीत आहे.

                ७ सप्टेंबर रोजी दुध भेसळ रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दुध भेसळ समितीचे अध्यक्ष तसेच समितीतील सदस्य सचिव व समिती सदस्य यांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथे ३९ खवा विक्रेते, खवा उत्पादक व दुकाने आदी ठिकाणी भेट देऊन पडताळणी करुन तपासणी करण्यात आली. तपासणीअंती ५ ठिकाणांहून अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत ७ नमुने तपासणीसाठी घेण्यात येऊन पाठविण्यात आले आहेत. 

                तसेच अन्न व औषध विभागाची नोंदणी नसल्याने,परवाना नुतनीकरण नसल्याकारणाने ३ दुकानांना नोटीस देऊन ३ दुकाने बंद करण्यात आली आहेत.तसेच Weights and measurements यांच्याकडून ३९ दुकानांची संबंधित साहित्याची पडताळणी करुन विहीत मुदतीत फेर पडताळणी व मुद्रांकन न केल्यामुळे एका दुकानावरील काटा जप्त करुन खटला दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे.

                जिल्ह्यात दुध भेसळ प्रतिबंधक समितीमार्फत दुध व दुग्धजन्य पदार्थ  विक्रेते,खाजगी व सहकारी दुध प्रक्रिया प्रकल्पधारक, सहकारी व खाजगी दुध संकलन केंद्र व संस्था आदी ‍ठिकाणी दुध भेसळ तपासणीची मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व दुध विक्रेते, दुध संकलन केंद्र,खाजगी व सहकारी दुध उत्पादक संस्था व दुध प्रक्रिया यांनी उच्च गुणप्रतीचे भेसळविरहीत दुध स्वीकृत व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसह ‍विक्री करण्याबाबत तसेच त्याकरीता  वापरात येणारे वजनकाटे व दुध गुणप्रत तपासणी सयंत्रे नियमित प्रमाणीत करुन अद्यावत ठेवावे. त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ व पशुखाद्य आदीबाबत उत्पादन दिनांक व मुदतपूर्व वापराबाबत माहिती छापण्याविषयी सर्व विक्रेत्यांना  जिल्हास्तरीय समितीने आवाहन केले आहे. दुध भेसळबाबत एफएसएसएआय टोल फ्री नं.१८००२२२३६५ हा उपलब्ध करुन दिला या टोल फ्री नंबरवर दुध भेसळबाबत नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.  

                 दुध भेसळ हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच दुधात खराब पाण्याची भेसळ केल्याने साथीच्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याने याला आळा घालण्यासाठी यापुढील काळात कठोर कारवाई करण्यात येत आहे. याची नोंद घेण्यात यावी. तसेच या संदर्भात नागरिकांनी जागरुक रहावे, असे आवाहन जिल्ह्यातील विक्रेते, खाजगी व सहकारी दुध प्रक्रिया प्रकल्पधारक, सहकारी व खाजगी दुध संकलन केंद्र व संस्था तसेच नागरिकांना शिंदे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !