आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये कौडगावचे दालन ठरतेय लक्षवेधी - आ पाटील रोजगार निर्मितीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये कौडगावचे दालन ठरतेय लक्षवेधी - आ पाटील

रोजगार निर्मितीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

 धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) - मुंबईतील आंतरराष्ट्रीय पातळीवरील टेकटेक्स्टिल प्रदर्शनात कौडगावाचे तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्पाचे दालन लक्षवेधी ठरत आहे. कौडगावाच्या औद्योगिक वसाहतीकडे जगभरातील उद्योजक आकर्षित व्हावे व त्यातून मोठी गुंतवणूक यावी यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून हे दालन उभारण्यात आले आहे. त्यामुळे १० हजार रोजगार निर्मितीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल पुढे पडले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

भारत सरकारच्या वस्त्रनिर्मिती विभागाच्या माध्यमातून तांत्रिक वस्त्रनिर्मिती उद्योगाशी संबंधित आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. दि.१२ ते १४ सप्टेंबर असे दोन दिवस हे प्रदर्शन चालणार आहे. यात एमआयडीसीने कौडगाव टेक्निकल टेक्सटाईल्स पार्कचे दालन उभारले आहे. देश विदेशातील अनेक उत्पादक कंपन्याही यात सहभागी झाल्या आहेत. 
आ पाटील यांनी दि.१२ सप्टेंबर रोजी या प्रदर्शनाला भेट देवून सहभागी उद्योजकांशी चर्चा केली. यातील काही उद्योजकांनी कौडगावमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्स्फूर्त सकारात्मकता दर्शविली असल्याचेही त्यांनी सांगितले. एमआयडीसी व केपीएमजीचे अधिकारीही यावेळी त्यांच्या सोबत होते. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडून देण्यात येत असलेल्या विशेष सवलती व लाभाची माहिती दिली. कौडगाव एमआयडीसीमध्ये प्रकल्पसाठी मोठ्या प्रमाणात जमीन, पाणी, वीज व गॅस आदी पायाभूत सुविधेसह रस्ते व रेल्वे मार्ग या दळणवळणाच्या सुविधाही उपलब्ध आहेत. तांत्रिक वस्त्र उत्पादनाच्या विविध क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे या क्षेत्रात वेगाने वाढ होत असल्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. इतर उद्योगांच्या तुलनेत तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्प आणण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. तर सतत पाठपुरावा करून मोठ्या आग्रहाने देशातील पाहिलाच तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्प एमआयडीसीच्या माध्यमातून मंजूर करुन घेण्यात आला असल्याचेही  त्यांनी सांगितले. यावेळी डीकेटीई सोसायटीचे टेक्सटाइल ऍण्ड इंजिनियरिंग इन्स्टिट्युटचे सी.ए. पाटील, एमआयडीसीचे मूख्य अभियंता राजेंद्र गावडे, केपीएमजीचे कन्सल्टंट धनश्री जाधव आदी उपस्थित होते.

.................

एमआयडीसीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील या प्रदर्शनीमध्ये कौडगावाचे दालन प्राधान्याने उभारण्यात यावे यासाठी आ पाटील यांनी सूचना केली होती. त्यामुळे हे दालन मांडण्यात आले. जगभरातील अनेक उद्योजक या दालनाला भेट देवून माहिती घेत आहेत. एमआयडीसीचे अधिकारी व त्यांची मार्केटिंग टीम परिपूर्ण माहिती देत आहे. जागतिक दर्जाच्या काही उद्योजकांनी कौडगावला प्रकल्प उभारण्यासाठी उत्सुकताही दर्शविली आहे. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीच्या माध्यमातून निश्चितच या क्षेत्रातील एखादा ऍंकर प्रकल्प मिळेल असा विश्वासही आ पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !