हैद्राबाद मुक्तिसंग्राम विषयी नळे यांचे व्याख्यान

हैद्राबाद मुक्तिसंग्राम विषयी नळे यांचे व्याख्यान

धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती संचलित, धाराशिव प्रशाला व स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ सप्टेंबर हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त युवराज नळे यांचे व्याख्यान चौथे झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना हैद्राबाद मुक्ति संग्राम लढा विषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष  उमाजीराव राजेंद्र देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव दिलीपराव गणेश तर जयपाल शेरखाने, ऍड. अजय वाघाळे व अस्मिता शिंदे आदी उपस्थित होते. तसेच दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक पी.एस. जाधव व ए.आर. माडेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख  सी.एन. माळी यांनी तर आभार रमण जाधव यांनी मानले. याप्रसंगी दोन्ही शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सत्रामध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक म्हणून भोसले, सोनवणे यांनी काम पहिले. स्पर्धेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांचे सहकार्य लाभले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !