कृषी पंपांना पुरेशा दाबाने सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) चे आंदोलन

कृषी पंपांना पुरेशा दाबाने सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) चे आंदोलन

धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - कृषी पंपाना पुरेशा दाबाने सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा. विजेचा लपंडाव थांबवावा. तसेच जिल्हात पाऊस लांबल्यामुळे शेतकरी बांधवावर दुष्काळाचे संकट असताना पाण्या अभावी पिके सुकत आहेत.‍ त्यातच महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी दुहेरी आस्मानी संकटात सापडला आहे. या विरोधात धाराशिव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर शिवसेना (ठाकरे) च्यावतीने दि.४ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन सुरु होते. तर दुपारी दोन नंतर विद्युत वितरण कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांच्या सभागृहात प्रवेश करीत आपल्या व्यथा मांडल्या. हे आंदोलन या ठिकाणी एक तास चालले. हे आंदोलन ३ तास चालल्याने वाहतूक एकेरी करण्यात आली होती. 

 विजेचे भारनियमन व लपंडावामुळे शेतीचा वीज पुरवठा २-२ दिवस खंडीत होत आहे. त्यामुळे एकेरी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. दुसऱ्या पावसाचे अत्याल्प प्रमानामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवलदिवल झाला आहे. अतिरिक्त केले जाणारे भार नियमण बंद करण्यात यावे व नियमीतपणे ८ तास योग्य दाबाने सुरळीतपणे वीज पुरवठा करण्यात यावा, उच्चदाब प्रणाली  योजने अंतर्गत मंजुर असलेले वैयक्तीक विद्युत संच जोडणीची (HVDS) प्रलबिंत कामे तात्काळ पुर्ण करावीत.  शेतकऱ्यांना वाहतुक व्यवस्थेचा कोणताही आर्थिक भार न लावता नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलुन देण्याची अंमलबजावणी करावी व जिल्हा कृषी आकस्मिक निधी योजने अंतर्गत मंजुर असलेले अतिरिक्त उपकेंद्र रोहीत्रची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत तसेच या योजने अंतर्गत मंजुर झालेले उपकेंद्र रोहित्र  क्षमतावाढचे  प्रलंबीत कामे पुर्ण करण्यात यावे.(ढोकी, केशेगांव, शहापुर, बेडगा),  अतिरिक्त ओव्हरलोड फीडरचे भार व्यवस्थापण व्यवस्थीत करुन सुरळीत विजपुरवठा करण्यात यावा, रोहित्र वरील किरकोळ दुरुस्तीचे कामे हे आपल्या अधिकृत कुशल मनुष्यबळा मार्फत करण्यात यावीत. तसेच विज अपघातातील पिडीताचे व पात्र नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना तात्काळ नुकसान भरपाई अदा करावी, गावातील किरकोळ दुरुस्ती समस्या निवारणा करिता विज कर्मचारी हा नेहमी उपलब्ध असावा, आरडीएसएस या योजनेतील कामे लवकरात लवकर करण्यात यावीत. सन २०२१ ते २०२३ मधील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत झालेल्या कामाचा दर्जा त्रयस्त  समिती मार्फत पडताळणी करण्यात यावा,  विशेष म्हणजे जिल्हा कृषी आकस्मिक निधी व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ज्या रोहीत्राची कामे झाले आहेत त्या ठीकाणी जुने रोहीत्रे बसवण्यात आले आहेत का ? या बाबत त्या कामाची चौकशी करण्यात यावी, महावितरणच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या (मेंटेन्स) कामाचे बील गुतेदारांना देण्यात आले आहे. त्या कामाची चौकशी करण्यात यावी. काही ठिकाणे असे निर्देशनास आले आहे की काम न करता देयके (बील) देण्यात आली आहेत. यासह इतर मागण्यावर तात्काळ अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकारी व महावितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांना महावितरण यांना देण्यात आले.  वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरील सर्व मागण्यांबाबत १५ दिवसांत योग्य मार्ग काढून त्या सोडवू असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या समक्ष दिल्यानंतर हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सह संपर्क प्रमुख नंदुभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, उपजिल्हाप्रमुख प्रदिप मेटे, विभागीय सचिव अक्षय ढोबळे,  धाराशिव तालुका प्रमुख सतीश सोमाणी, तुळजापुर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, वाशी तालुकाप्रमुख विकास मोळवणे, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, विश्वजीत नरसिंग जाधव, शामभैय्या जाधव, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, उमरगा शहर प्रमुख रणधीर सुर्यवंशी, संग्राम देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख, सुधाकर पाटील,नितीन शेरखाने, दत्ता बंडगर, रवि वाघमारे, बाळासाहेब काकडे, पंकज पाटील, मुजीफ काझी, आबेद सय्यद, कलीम कुरेशी, धनंजय इंगळे, अमोल मुळे आफरोज पिरजादे,निलेश शिंदे, राणा बनसोडे,दिनेश बंडगर,दिपक पाटील अभिजीत देशमुख, काका शिनगाडे,विशाल जमाले, तुळशीदास जमाले, अंकुश मोरे, सचीन शेंडगे, मोईन पठाण, शहबाज पठाण, नवज्योत शिंगाडे, हनमंत यादव बापू साळुंके,विजय कुंदरे, छोटा साजीद, गफुर शेख, राजाभाऊ भांगे, रवी कोरे, परीक्षित विधाते, मनोहर धोंगडे, आदिनाथ इंगळे, नामदेव कांबळे, अतीक सय्यद, पवन सावंत
 आदींसह शिवसैनिक व पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



...................

हे सरकार गतिमान असून शेतकऱ्यांचे असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी जाहिराती केल्या जातात. मात्र त्या जाहिराती खिडक्या नसलेल्या दरवाजे मोडलेल्या बसेस वर लावून सरकार आपलेच हासे करून घेत असल्याचा टोला खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लगावला. तसेच शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा द्यावा. केंद्र सरकारने विजय मल्ल्या व इतर उद्योजकांचे किती कोटीचे कर्ज माफ केले ? याची माहिती जनतेला दिली जात नाही किंवा त्याची माहिती होऊ नये म्हणून गॅसचे दर २०० रुपयांनी कमी केलेले आहेत. मात्र त्याचाच गावगावा सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच शेतकऱ्याकडून पिक विमा पोटी एक रुपया भरून घेतला जात असला तरी अकराशे रुपये हे जनतेच्या करारातील भरून ते विमा कंपनीला दिले जात आहेत. इतकेच नाही तर विमा कंपनी धोरण हे केवळ कंपनी वाल्यांना जगविण्यासाठीच केले असल्याचा आरोपही खा राजेनिंबाळकर यांनी केला.  

...............

दुखणं हल्याला अन् इंजेक्शन पकालीला !

मराठा आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करीत असलेल्या मराठा समाजातील महिला व मुलावर लाटी हल्ला करून त्यांचे रक्त सांडले आहे. या विरोधात सर्वत्र आंदोलन पेटले असल्यामुळे सरकारने संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई अवलंबिवली आहे. ती अतिशय चुकीची आहे. कारण दुखणं हल्याला अन् इंजेक्शन पकालीला या मराठीतील म्हणी प्रमाणे कारवाई करायचीच असेल तर लाठी चार्ज करण्याचे आदेश देणाऱ्यांवर करावी असे सांगत आ. कैलास पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच महाआघाडीचे सरकार असताना मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र सरकारने वीज द्यावी अशी मागणी फडणवीस करीत होते. आता त्यांची सरकार असून ते का वीज पुरवठा करीत नाहीत ? असा सवाल करीत राज्य सरकार हे शेतकरी विरोधी असून या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कसलाही कळवळा नसल्याचा हल्लाबोल आ पाटील यांनी केला. 

..................

शिवसैनिकाला आली भोवळ !

महावितरण कार्यालयासमोर आंदोलनात झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यापैकी कळंब तालुक्यातील सौंदना येथील नेताजी जावळे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते आपले म्हणणे सांगत असतानाच त्यांना अचानक पणे भोवळ आली. तितक्यात प्रसंगावधान राखत शिवसैनिकांनी त्यांना पकडले. तात्काळ खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या गाडीमध्ये कसबे तडवळा येथील विशाल जमाले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचार करताच ते ठणठणीत बरे झाल्याने ते पुन्हा शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !