शासकीय कार्यालयात शिवकालीन बोधचिन्ह लावण्याची मागणी

शासकीय कार्यालयात शिवकालीन बोधचिन्ह लावण्याची मागणी
धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - ३५० वा शिवराज्याभिषेकनिमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे पत्र व्यवहारात वापर करणे. तसेच त्या बोधचिन्हाचे शासकीय कार्यालयामध्ये दर्शनी भागामध्ये फोटो फ्रेम लावण्यात यावे अशी मागणी शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने एका निवेदनाद्वारे दि.२० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

 महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय दि‌.२४ जुलै अन्वये शासन आदेश पारित झालेला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या प्रचार प्रसिद्धी व शासकीय पत्र व्यवहारात या बोधचिन्हाचा कटाक्षाने वापर करण्याचा आदेश झालेला आहे. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष धर्मराज सुर्यवंशी, शशिकांत खुने, जयराज खोचरे, आकाश कोकाटे, संतोष घोरपडे, ऍड. संजय शिंदे, अच्युत थोरात, मेजर विष्णू यमपुरे, दत्तात्रय साळुंके, योगेश आतकरे उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !