व्हॉईस ऑफ मीडियाची राज्यकार्यकारणी जाहीर

व्हॉईस ऑफ मीडियाची राज्यकार्यकारणी जाहीर


धाराशिव दि.१५ (प्रतिनिधी) - व्हॉइस ऑफ मीडियाच्या शिक्षण विभागाचे मुख्य समन्वयक चेतन कात्रे हे संघटनेचे सरचिटणीस तर राज्य कार्य कार्यकारिणीवर सयाजी शेळके यांची निवड करण्यात आली आहे.  ही निवड राज्याध्यक्ष अनिल मस्के यांनी जाहीर केली.

देशभरात अल्पावधीत नावारूपास येऊन सुमारे ३६ हजार पत्रकार सदस्य आहेत.
व्हॉइस ऑफ मीडियाची राज्य कार्यकारणी  घोषीत झाली असून, त्यात मराठवाड्यातून गजानन देशमुख, तुकाराम झाडे, संजय मालानी, बालाजी मारगुडे, जयप्रकाश दगडे, नागोराव भांगे, विजय पाटील, ज्ञानेश्वर भाले, पंढरीनाथ बोकारे, सुरज कदम, व्यंकटेश वैष्णव, नूर अहेमद, विश्वनाथ देशमुख,  करुणा टाकळगावकर यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नंदकुमार सुतार, संतोष शाळीग्राम तर उपाध्यक्षपदी विलास आठवले, तुकाराम झाडे, प्रकाश कथले, जयप्रकाश दगडे यांची निवड करण्यात आली आहे. दुर्गेश सोनार आणि खजिनदारपदी गजानन देशमुख, राज्य समन्वयकपदी संजय मिस्किन व संदीप महाजन यांची पत्रकार हल्ला विरोधी फोरमच्या राज्याध्यक्ष व राजेंद्र थोरात यांची राज्य उपाध्यक्ष तथा मुंबई विभाग समन्वयकपदीही निवड करण्यात आली आहे. तसेच कोकण विभागाचे समन्वयक म्हणून फिरोज पिंजारी यांची तर पश्चिम महाराष्ट्राच्या विभाग समन्वयकपदी तथा राज्य उपाध्यक्ष म्हणून अजित कुकुलोळ यांची व सुरेश उज्जैनवाल यांची उत्तर महाराष्ट्र विभाग तथा राज्य उपाध्यक्ष म्हणून तर संजय मालानी यांची मराठवाडा विभाग समन्वयक तथा राज्य उपाध्यक्ष म्हणून म्हणून तसेच आनंद आंबेकर यांची राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ विभाग समन्वयक म्हणून तर संघटनेचे राज्य कार्यवाहक म्हणून बालाजी मारगुडे व यास्मिन शेख यांची व ओमकार वाबळे, नागोराव भांगे, सुधीर चेके, विजय पाटील, सुनील कुहिकर, प्रशांत शर्मा यांची राज्य संघटक तर राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजेश्वर पालमकर व प्रवक्ता म्हणून रोहिदास राऊत तर सहसरचिटणीसपदी डॉ. ज्ञानेश्वर भाले, पंढरीनाथ बोकारे, अनिल बाळसराफ व सहकार्यवाहक म्हणून सुरज कदम, व्यंकटेश वैष्णव, संजय तिपाले व नितीन पखाले तसेच सदस्य म्हणून नूर अहमद, अनिल पाटील, रमेश दुरुगकर, एकनाथ चौधरी, चेतन व्यास, अंकुश वाकडे, विश्वनाथ देशमुख, प्रकाश दांडगे, नरेश होळणार, सिद्धेश्वर पवार, सयाजी शेळके, ओमकार नागांवर, किशोर मोरे, बाळू कोकाटे, महेश पाटील, प्रमोद बऱ्हाटे, शरद लोणकर यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, राही भिडे, जयश्री खाडीलकर, भरतकुमार राऊत, श्रीराम पवार, श्रीपाद अपराजित, रवींद्र आंबेकर, प्रसन्न जोशी, विद्या विलास पाठक, शरद कारखानीस, राधेश्याम चांडक, श्रीकृष्ण चांडक हे मुख्य मार्गदर्शक आहेत. 
नूतन राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रमुख संदीप काळे, संजय आवटे, मंदार फणसे, धर्मेंद्र जोरे, डॉ. नरेंद्र बोरलेपवार, चंद्रमोहन पुप्पाला, चेतन बंडेवार, शंतनू डोईफोडे, सुधीर लंके, परवेज खान, अश्विनी डोके, दिव्या पाटील यांनी अभिनंदन केले आहे.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !