जिल्ह्यातील २१७२५ शेतकरी कुटुंबकर्त्या महिलांच्या खात्यावर ४ कोटी ४९ लाख ५४ हजार रुपये जमा

जिल्ह्यातील २१७२५ शेतकरी कुटुंबकर्त्या महिलांच्या खात्यावर ४ कोटी ४९ लाख ५४ हजार रुपये जमा

मल्लिकार्जुन सोनवणे

धाराशिव दि.७ - जिल्ह्यातील एपीएल शेतकरी असलेल्या २१ हजार ७२५ शिधा पत्रिकाधारकांमधील ९९ हजार ८९९ लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी प्रती १५० रुपयाप्रमाणे जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी ४ कोटी ४९ लाख ५४ हजार ५५० रुपये वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेचा कुटुंबकर्त्या महिलांना थेट फायदा होऊ लागला आहे.

अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधा पत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी २०२३ पासून अन्नधान्या ऐवजी प्रती महिना प्रती लाभार्थी १५० रुपये रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची (डीबीटी) योजना कार्यान्वित करण्यासाठी शासन निर्णय क्रमांक अघापु - २०२२ / प्रक्र / ४६ / नापु २२ दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम कुटुंबातील महीला प्रमुखाचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीएफएमएस प्रणाली आधारे थेट जमा करण्यात येत आहे.
दि.६ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील एकूण २१ हजार ७२५ शिधा पत्रिकामधील ९९ हजार ८९९ लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी प्रती १५० रुपयाप्रमाणे जानेवारी ते मार्च या कालावधीतील रक्कम जमा करण्यात आली आहे. तर उर्वरीत एप्रील ते जून या कालावधीची रक्कम लवकरच पात्र शिधा पत्रिकाधारक महीला कुटूंब धारकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
तसेच या योजनेत पात्र असलेल्या शिधा पत्रिकाधारकांनी आजपर्यंत विहीत नमुन्यातील
अर्ज संबंधित रास्त भाव दुकानदार अथवा संबंधित तलाठी यांच्याकडे जमा केले नसल्यास पात्र शिधा पत्रिकाधारकांनी डीबीटीसाठी आवश्यक असलेल्या बँक खात्याचा विहीत नमुन्यातील फॉर्म संबंधित रास्त भाव दुकानदार किंवा तलाठी यांच्याकडून हस्तगत करावा. तसेच हा अर्ज भरून अर्जासोबत शिधा पत्रिकेच्या पहील्या व शेवटच्या पानाची छायांकीत प्रत, बँक पासबुकाच्या पहील्या (खात्याचा आवश्यक तपशील दर्शविणाऱ्या) पानाची प्रत, शिधा पत्रिकेतील सदस्यांच्या आधार कार्डाची छायांकित प्रत व जमीनीचा ७/१२ व ८अ तसेच विहीत नमुन्यातील शपथपत्र संबंधित स्वस्त धान्य दुकानदार किंवा तलाठी यांच्याकडे द्यावेत. तर या योजने अंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम महीला कुटूंब प्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जर काही पात्र शिधा पत्रिकाधारक महीला कुटूंब प्रमुखाचे कोणत्याही बँकेत खाते नसल्यास त्या महीलांनी नजिकच्या बँकेत अथवा पोस्टात खाते काढून घ्यावे व त्याची छायांकित प्रत अर्जासोबत वरील कागदपत्रासह संबंधित रास्त भाव धान्य दुकानदार अथवा संबंधित तलाठी यांच्याकडे जमा करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे व जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी केले आहे. 
....................

तालुकानिहाय वितरीत करण्यात आलेल्या शिधा पत्रिका, लाभार्थी संख्या व रक्कम पुढीलप्रमाणे - धाराशिव - ४८१६ - २५४२ - ११२९२७५०, वाशी - १२५० - २५४२ - ११४३९००, परंडा - १८१८ - -८२०६ - ३६९२७००, उमरगा - ५१०१ - २३२१९ - १०४४८५५०, कळंब -१९११ - ८६५२ - ३८९३४००, लोहारा - १८३ - ७७९ - ३५०५५९, भूम - २८६१ - १२७४३ - ५७३४३५० व तुळजापूर - ३७८५ - १८६६३ - ८३९८३५० असे एकूण २१ हजार ७२५ शिधा पत्रिकामधील ९९ हजार ८९९ लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी प्रती १५० रुपयांप्रमाणे जानेवारी ते मार्चपर्यंत एकूण ४ कोटी ४९ लाख ५४ हजार ५५० रुपये वितरित करण्यात आले आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !