भारतीय संविधान उद्देशिका देऊन अभियंता दिन साजरा
भारतीय संविधान उद्देशिका देऊन अभियंता दिन साजरा
धाराशिव दि.१५ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय अभियंता दिनाचे औचित्य साधून मतदार जनजागरण समिती उस्मानाबादच्यावतीने अभियंता दिनानिमित्त भारतीय संविधान उद्देशिकाची प्रत देऊन दि.१५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला.
भारतरत्न, अभियंता, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांची जयंती, राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पसह इतर त्यांच्या कार्याचे स्मरण समितीच्यावतीने करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी शुभेच्छा देताना फुल बुके ऐवजी पुस्तक भेट द्यावीत असे आवाहन केले आहे. त्यास प्रतिसाद देत अभियंते एफ.वाय. पठाण हे डायलिसिसवर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाऊन पठाण यांना भारतीय संविधान उद्देशिकाची प्रत देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच अभियंते तथा पर्यटन विकास समितीचे कार्याध्यक्ष रणजित रणदिवे यांना देखील शुभेच्छा दिल्या. यावेळी समितीचे सचिव अब्दुल लतिफ, उपाध्यक्ष गणेश वाघमारे, सदस्य मुकेश शिंदे, गाडे, श्रीकांत गायकवाड, अविनाश नन्नवरे आदींसह मतदार जनजागरण समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.