जिल्हा क्रिकेट असोसिएशनमुळे खेळाडूंचे नुकसान - देवकते

जिल्हा क्रिकेट असोसिएशनमुळे खेळाडूंचे नुकसान -  देवकते


धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) - उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनची नोंदणी २०११ नंतर कोणतीही निवडणूक न घेता अथवा लेखा अहवाल सादर न केल्यामुळे सहधर्मादाय आयुक्तांनी रद्द केलेली आहे. तरीही जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय दंडनाईक व दत्ता बंडगर हे सदरील प्रमाणपत्राचा गैरवापर करुन खेळाडूंसाडी निवड चाचणी स्पर्धा घेत आहेत. यामुळे खेळाडूंचे नुकसान होत असल्याने संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी आपण पाठपुरावा करीत असल्याची माहिती माजी खेळाडू इंद्रजित देवकते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२२ सप्टेंबर रोजी दिली. 

पुढे बोलताना देवकते म्हणाले की, २००८ साली उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनची नोंदणी झाली होती. त्यानंतर २००८ ते २०११ पर्यंत त्यांचा कालावधी होता. त्यानंतर २०११ ते २०१८ पर्यंत संघटनेने निवडणूक घेतली नाही किंवा लेखा परीक्षण अहवालही सादर केला नाही. त्यामुळे २०१८ साली सहधर्मादाय आयुक्तांनी संघटनेेचे प्रमाणपत्र रद्द केलेले आहे. तरीदेखील क्रिकेट असोसिएशन १९ वर्षाखालील, १४ वर्षाखालील क्रिकेट संघाची निवड चाचणी घेत आहेत. ही निवड चाचण्या बार्शी तालुक्यातील क्रिकेट मैदानावर घेण्यात येत असल्याने बाहेरील जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग जास्त आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील खेळाडूंचे नुकसान होत आहे. तसेच जिल्ह्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेट मैदान मंजूर झाले होते. परंतू जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधील चुकीचे नियोजन आणि घोटाळ्यामुळे सदरील मैदानाचा निधी परत गेला. क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळाडूंचा सहभाग असणे गरजेचे असताना इतर व्यक्तींची संख्या यामध्ये अधिक होती. यामधील अनेकजण मयत झालेले असून अनेकांचा पत्ता एकाच ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे या प्रकरणात आम्ही सहधर्मादाय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी निवेदने दिली, परंतु कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे पालकांनी दक्ष राहावे, असे आवाहनही देवकते यांनी केले.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !