हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सेनानींचा विशेष सन्मानाने गौरव​ स्वातंत्र्य सेनानींच्या घरी झळकणार नावाची पाटी उस्मराठवाड्यात फक्त धाराशिव जिल्हा अग्रेसर

हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सेनानींचा विशेष सन्मानाने गौरव

​स्वातंत्र्य सेनानींच्या घरी झळकणार नावाची पाटी

मराठवाड्यात फक्त धाराशिव जिल्हा अग्रेसर

धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - हैदराबाद मुक्ती संग्रामात निजामाची जुलमी राजवट झुगारून देण्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींचा व त्यांच्या वारस कुटुंबियांचा त्यांच्या घरी जाऊन स्वातंत्र्य सेनानींचे नाव व अमृत महोत्सव लोगो असलेली पाटी, टोपी, खादी शाल व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते दि.२ सप्टेंबर रोजी विशेष सन्मान व गौरव करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक स्वातंत्र्य सेनानींच्या घरी त्यांच्या नावाची पाटी झळकणार आहे.

हैद्राबाद संस्थानाची जुलमी राजवट व जोखडे झुगारुन देत स्वातंत्र्य सेनानींना अत्यंत कडवी झुंज दिली. यामध्ये अनेकांनी प्राणांची बाजी लावली. त्यामुळे हैद्राबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींचा सन्मान व यथोचित गौरव व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुरलीधर रामचंद्र मसलेकर (भारतराव व लक्ष्मीबाई मसलेकर), जयकुमार फुलचंद अजमेरा, (आरती, राजकुमार व पदमकुमार अजमेरा), शेषराव नामदेव बनसोडे व पत्नी विजया बनसोडे, वसंत भगवान उंबरे (कलावती व मुलगी शीला, मुलगा भगवान) व‌ बाबुराव नामदेव काकडे यांच्या पत्नी भागिरथीबाई यांचा यथोचित सन्मान करुन गौरविण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसिलदार डॉ शिवानंद बिडवे, महसूल सहाय्यक शुभम काळे, मंडळ अधिकारी श्रीनिवास पवार, चंद्रकांत जाधव, तलाठी श्रीधर माळी, कोतवाल श्रीकांत शेवाळे आदी उपस्थित होते.

......................

स्वातंत्र्य सेनानींचा सन्मान व गौरव सोहळा करणारा धाराशिव जिल्हा हा मराठवाड्यातील प्रथम असून जिल्हाधिकारी डॉ ओंबासे यांनी यासाठी विशेष कौशल्य पणाला लावून परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक स्वातंत्र्य सेनानींचा अमृत महोत्सवी वर्षात खरा गौरव होत आहे. त्यामुळे हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास नव्याने नवीन पिढीसमोर येत आहे. या माध्यमातून स्वातंत्र्य सेनानी व त्यांच्या पाल्यांना देखील प्रेरणा मिळण्यास मदत होणार आहे.

....................

जिल्ह्यातील १६०० स्वातंत्र्य सेनानींच्या घरी जाऊन त्यांच्या नावाची आकर्षक असलेली पाटी देण्यात येणार आहे. तसेच या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या वारसांना शासकीय ओळखपत्र तयार करून देण्यात येणार आहे. तर दि. १३ ते १६ सप्टेंबर दरम्यान हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिनाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिक यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी केले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !