तुळजापूर-औसा महामार्ग क्र.३६१ साठी ६१.८ कोटी रुपये मंजूर - खा. राजेनिंबाळकर

तुळजापूर-औसा महामार्ग क्र.३६१ साठी ६१.८ कोटी रुपये मंजूर - खा. राजेनिंबाळकर

धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातून जाणाऱ्या महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गापैकी तुळजापूर-औसा राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यासाठी नव्हे तर मराठवाडा व विदर्भ यांच्याशी थेट संपर्क निर्माण करणारा महामार्ग आहे. या महामार्गावरील तुळजापूर-औसा तालुक्यात अनेक ठिकाणी अपुर्ण  कामे  २०१९ या वर्षापासून प्रलंबित आहेत. या महामार्गावर या अपूर्ण कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढूण मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हाणी होत असल्यामुळे नागरिकांकडून वारंवार तक्रारी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे प्राप्त होत होत्या. त्यानंतर खा. राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या निर्दशनास आणून दिले तरीही प्रशासकिय विलंबामुळे या कामास योग्य ती गती प्राप्त होत नव्हती. दि.२६ जून २०२० रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी, राष्ट्रीय प्राधिकरणचे प्रकल्प संचालक व इतर अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन त्याच दिवशी तत्काळ पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.  तर दि. २ ऑक्टोबर २०२१ रोजी पुनश्च : पाहणी दौरा करण्यात आला व सदर राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत प्रकल्प संचालक यांना निर्देशित करण्यात आले. दि. २४ जुलै २०२० रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांन समवेत आढावा बैठक घेऊन तुळजापूर तालुक्यातील सर्व अपूर्ण कामांचे अंदाजपत्रक बनवून मान्यतेसाठी पाठवून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग यांनी तुळजापूर तालुक्यातील सर्व अपूर्ण कामाचे अंदाजपत्रक विभागीय कार्यालया मार्फत अंतिम मंजूरीसाठी नितीन गडकरी यांच्याकडे पाठवून दिले. या कामाच्या अनुषंगाने खा. राजेनिंबाळकर साहेब यांनी दि.४ ऑगस्ट २०२२ रोजी  दिल्ली येथे भेट घेऊन या महामार्गावरील उपरोक्त तालुक्यतील सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत आग्रह व विनंती केली.

खा राजेनिंबाळकर यांच्या आग्रहामुळे या प्रलंबित कामांसाठी ६१.८ कोटी रुपये मंजूर केल्याचे खा. राजेनिंबाळकर यांना पत्रान्वये दि.२४ जुलै रोजी कळविले आहे. या कामामध्ये प्रामुख्याने तुळजापूर बाहय वळण रस्त्यावरील काक्रंबा गावातील उड्डान पुलासाठी २५ कोटी रुपये तसेच तुळजापूर येथील  सर्व्हिस रोड,  ताकविकी येथे सर्व्हिस रोड व सिमेंट नाली बांधकाम, हिंन्दुस्थान एज्युकेश सोसायटी, औसा येथे पादचारी पुल  (फुट ओव्हर ब्रीज) (मायनर जंक्शन) छोटया स्थानवरील दुरुस्ती करिता  ३६.८ कोटी रक्कम या सर्व कामांसाठी मंजूर झाले.

             तुळजापूर-औसा महामार्गा क्र.३६१ वरील अपूर्ण कामे पूर्ण करणेबाबत एकूण ६१.८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे या महामार्गावरील दळणवळण व्यवस्था सुरळीत होऊन अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची काक्रंबा गावातील उड्डाण पुलामुळे सोय होऊन वाहतुकीची  कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. खा. राजेनिंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे प्रलंबित कामे पूर्ण होणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !