हिंदी पखवाड्याचे प्राचार्य सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

हिंदी पखवाड्याचे प्राचार्य सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - जवाहर नवोदय विद्यालयात हिंदी पखवाड्याचे उद्घाटन समारंभ विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांच्या हस्ते हिंदीचे थोर साहित्यकार मुंशी प्रेमचंद  यांच्या प्रतिमेचे पूजन  व दीप प्रज्वलन करून दि.१४ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
हिंदी पखवाडा १४ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर  या कालावधीमध्ये साजरा केला जाणार असून यामध्ये प्रश्न मंजुषा, निबंध लेखन, कविता वाचन, स्वरचित कविता लेखन, पत्र लेखन, भाषण, चित्रकला, सुलेखन, रांगोळी व स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी रणवीर भातलवंडे या विद्यार्थ्यांने हिंदीचे महत्त्व या विषयावर आपले विचार व्यक्त केले. तर शिक्षिका सुजाता लोखंडे यांनी हिंदी दिवसाचे महत्व, या दिवसाचीच निवड का केली, का साजरा केला जातो ? याबाबत आपले विचार व्यक्त केले. तसेच प्राचार्य गंगाराम सिंह यांनी संपूर्ण जगामध्ये हिंदी भाषा बोलली जाते. तर आपली असणारी राष्ट्रभाषा आणखी प्रचार, प्रसार व्हावा यासाठी दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त हिंदी राष्ट्रभाषेचा उपयोग करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.  या कार्यक्रमासाठी भागवत गवले, सुजाता लोखंडे, सुनीता वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !