मंत्री बनसोडे यांच्या हस्ते एस पी शुगरचा बॉयलर अग्निप्रदीपन पडले पार
- Get link
- X
- Other Apps
मंत्री बनसोडे यांच्या हस्ते एस पी शुगरचा बॉयलर अग्निप्रदीपन पडले पार
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) - एस.पी. शुगर ऍण्ड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या ६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे दि.२९ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला.
यावेळी कारखान्याचे चेअरमन सुरेश पाटील, शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, सुरेश बिराजदार आदींसह मान्यवर उपस्थित होते.
चेअरमन सुरेश पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील एस.पी. शुगर ऍण्ड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड हा यावर्षीचा एकमेव कारखाना आहे, की जो आमच्या सभासदांना व शेतकऱ्यांच्या उसाला कमीत कमी भाव २ हजार ८०० रुपये देईल.
मंत्री बनसोडे म्हणाले की, सहकारी कारखाने, प्रायव्हेट कारखाने त्यांचा भाव किती देणार आहेत आणि आपण किती देणार आहोत ? हे सुद्धा जाहीरपणे सुरेश पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी २ हजार ८०० रूपये हा कमीत कमी भाव जाहीर केला असला तरी त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितले की, दुसरा कारखाना जर जास्त भाव देत असेल तर आपण २ हजार ८०० रुपयांपेक्षा जास्त भाव देऊ असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
शासन सहकारी साखर कारखान्याना जी काही मदत लागेल ती मदत करण्याचे काम सुद्धा भविष्यकाळामध्ये होणार आहे.ज्या शेतकऱ्यांचे यावर्षी पीक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाईसुद्धा पीक विम्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही.विजेच्या बाबतीत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय सुद्धा शासन लवकरात लवकर घेत असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
- Get link
- X
- Other Apps