मीनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते श्री सिध्दीविनायक ऍग्रीटेकचा बॉयलर अग्नि प्रदीपन
मीनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते श्री सिध्दीविनायक ऍग्रीटेकचा बॉयलर अग्नि प्रदीपन
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी येथील श्री सिध्दीविनायक ऍग्रीटेक इंडस्ट्रीज लि. या कारखान्याचा सन २०२३-२४ चा द्वितीय गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री मीनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते मशिनरीचे विधिवत पूजन करुन बॉयलर अग्नि प्रदीपन दि.२४ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
गतवर्षी प्रथम गळीत हंगामात कारखान्याने ७१ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करुन परिसरातील शेतकर्यांना मोठा दिलासा दिला होता. तर यावर्षीच्या द्वितीय गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज झाला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. प्रतीक देवळे यांनी तर आभार गणेश कामटे यांनी मानले. सोहळ्यास व्यंकटेश कोरे, दिनेश कुलकर्णी, सुजित साळुंखे, हरी सिरसाठ यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार व ग्रामस्थ उपस्थित होते.