ईद ए मिलादनिमित्त लोहारा शहरात मिरवणूक

ईद ए मिलादनिमित्त लोहारा शहरात मिरवणूक

लोहारा दि.३० (प्रतिनिधी) - ईद ए मिलादनिमित्त जुलुस कमिटीच्यावतीने मुस्लिम बांधवांनी भव्य मिरवणूक काढली. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद-ए-मिलाद म्हणून साजरा केला जातो. मिरवणुकीस मौलाना फज्जुसाब कादरी यांच्या नेतृत्वाखाली महेबुब सुबानी दर्ग्यापासून करण्यात आली. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक मार्गे ईदगाह मस्जिद जवळ सांगता करण्यात आली. यावेळी महम्मद चुणेवाले यांच्यावतीने सर्व मुस्लीम बांधवासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी हाफीजसाब शमशोददीन पठाण, हैदर शेख, उस्मान हेड्डे, इस्माईल मुल्ला, शब्बीर गवंडी, आयुब शेख, नगरसेवक अमिन सुंबेकर, हाजी शेख, आयाज सवार, नयुम सवार, वहाब हेड्डे, अमीन कुरेशी, सलीम कुरेशी, गौस कुरेशी, बक्षु फुटाणकर, वजीर मनियार, शब्बीर गंजीवाले यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !