नळदुर्ग येथील बुद्ध नगरातील निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याच्या कामाची चौकाशी करावी


नळदुर्ग येथील बुद्ध नगरातील निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याच्या कामाची चौकाशी करावी

नळदुर्ग दि.९ (प्रतिनिधी) - नळदुर्ग येथील बुद्ध नगर मधील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट केले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये नगर पालिकेने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.
नळदुर्गच्या विकास आराखड्यात शहरातील दलित वस्तीमध्ये बुद्ध नगर भागात शासकीय गोडाऊनच्या समोरील बाजू लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत नळदुर्ग अंतर्गत विकास कामांना गती देण्यासाठी व या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभी केली जाते.  कारण नळदुर्ग येथे गतवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत झालेल्या जिल्हा परिषद कन्या प्रशाला नळदुर्ग ते शासकीय गोडाऊन समोरील अक्कलकोट रस्ता नजीकचे काम अंदाजे किंमत ५१ लाख ८९ हजार रुपये असताना दि. २ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्रीच्या वेळी ८ : ३० च्या दरम्यान रात्री ठेकेदार काम करत असल्याचे उघडकीस आल्यामुळे या कामावर दादासाहेब बनसोडे व काही नागरिक गेले असता रात्रीच्या वेळी  काम कशासाठी केले जात आहे ? अशी विचारणा केली असता आम्ही कॉंक्रीट अंतरून घेतोय असे सांगत काँक्रेट रस्त्याचे काम तात्काळ बंद करण्यात आल्याचा याचा पुरावा सुद्धा आहे .
परंतु हा रस्ता शासकीय स्तरावरील नगर परिषदेच्या अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत अंदाजे किम्मत 51 लाख 89 हजार रुपयेचे आसताना रात्रीचे काम करित आसतानाचे पुरावे आहेत ऐवढे भक्कम पुरावे आसताना नगर परिषद मात्र मुग गुळुन गप्प का आहे आशा गुत्तेदारावर कारवाई का करित नाही  आशा गुत्तेदाराला नगर परिषद पाठीशी का घालतेय तेरी भी चुप मेरी भी चुप म्हणत गाव तिथ दलित वस्ती आहे . शहर विकासात दलित वस्तीतील  निकृष्ट दर्जाचा हा रस्ता दलित वस्तीचा असताना हा  दलित वस्तीत काम चालू आहे हे माहीत असताना सुद्धा ठेकेदाराने दलितांचा किंवा तेथील नागरिकांचा कसला ही विचार न करता निकृष्ट दर्जाच्या कामाची मालीका मात्र चालूच ठेवली परंतु  निकृष्ट दर्जेच्या कामावर रात्री ८:३० च्या सुमारास एकही अधिकारी दिसुन आले नाहीत. हे काम जेसीबीद्वारे अतिशय निकृष्ट केले असून गुत्तेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच हे काम रस्ता खोदकाम करणे ४० एम एम खडी अंतरून १० इंचाचे मजबुतीकरण करणे. शिवाय त्याच खडीने ५ इंच बेड टाकणे, त्यानंतर बारीक खडीने ५ इंचाचा रस्ता तयार करणे असे काम करण्याऐवजी केवळ ५ ते ६ इंच रस्ता बनवुन दलित जनतेची व प्रशासनाची फसवणूक केली आहे. या निकृष्ट कामाची ४५ लाख रुपये बिलाची एम बी करुन त्याचे बील देखील अदा करण्यात  आले असल्याचे समजते. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामाची रीतसर चौकशी करून योग्य ती कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !