तेरणा कृषी ड्रोन सेंटरला ऑर्किड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट

तेरणा कृषी ड्रोन सेंटरला ऑर्किड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट

धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आलेल्या दोन सेंटरला सोलापूर येथील ऑर्किड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ड्रोनबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

दिवसेंदिवस तंत्रज्ञानाची प्रगती होत असून त्यामध्ये आधुनिकतेकडे नेण्यासाठी कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण अशा ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वाढत चाललेला आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझशन हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.तर तेरणा प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी प्रवेश घेऊन ड्रोन उडवण्याचा परवाना प्राप्त केलेला आहे. मराठवाड्यातील एकमेव असलेले ड्रोन प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असून केंद्रामध्ये आजपर्यत शासकीय तंत्रनिकेतन लातूर, शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव व बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय लातूर येथील विद्यार्ध्यांनी भेट दिलेली आहे. तर आपल्या तांत्रिक ज्ञानामध्ये ड्रोन संदर्भात माहिती अद्यावत केलेली आहे. त्या अनुषंगाने तेरणा कृषी ड्रोन प्रशिक्षण केंद्रामध्ये सोलापूर येथील ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तेरणा कृषी प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन ड्रोन संदर्भात विविध माहिती आत्मसात केलेली आहे. त्यांनी ड्रोन सिम्युलेटर व प्रात्यक्षिकांवर भर दिलेला आहे. कार्यशाळेमध्ये त्यांनी ड्रोनचे विविध उपयोग, विविध भाग व ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती घेतलेली आहे. यावेळी ऑर्किड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मेतन, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, प्रा. ए.झेड. पटेल,  प्रा. उमेशचंद्र जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भेटीनंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !