१४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड चाचणी

१४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड चाचणी
 धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन १४ वर्षाखालील राज्य संघ निवडीसाठी आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा २०२३-२४ साठी जिल्ह्याचा मुलांचा संघ निवड चाचणी स्पर्धा शनिवार दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता सहारा स्पोर्ट ग्राऊंड शिराळा - येरमाळा बार्शी रोड येथे होणार असल्याची माहिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव दत्ता बंडगर यांनी दिली.

निवड चाचणीसाठी १/९/२००९ ही कट ऑफ डेट असून या तारखेच्या पुढील जन्म असलेल्या खेळाडूंना सहभागी होता येईल. निवड चाचणी करिता जन्म तारखेचा दाखला, आधार कार्ड, खेळाचे संपूर्ण किट, रंगीत फोटो सोबत आणावा. ज्या खेळाडूंची जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे नोंदणी केलेली असेल अशाच खेळाडूंना निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीसाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन बंडगर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रियाज शेख (९२८४५३८७०४), युवराज पवार  (९९२१८९७९६५) यांच्याशी संपर्क साधावा.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !