घाटंग्री येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखेचे धुरगुडे यांच्या हस्ते उद्घाटन

घाटंग्री येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखेचे धुरगुडे यांच्या हस्ते उद्घाटन


धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - तालुक्यातील घाटंग्री येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते दि.२४ सप्टेंबर रोजी करण्यात आले. 

घाटंग्री शाखेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत राठोड तर उपाध्यक्ष रमेश जाधव, सचिव संजय राठोड, खजिनदार बाळू जाधव, सरचिटणीस विनोद जाधव यांची तर सदस्य म्हणून बबन राठोड, सागर राठोड, उमेश जाधव, सुखदेव राठोड, सचिन जाधव, रोहिदास राठोड, विष्णू राठोड, संजय पवार, सुमित जाधव, मनोज जाधव, सतीश राठोड, स्वप्निल राठोड, अर्जुन राठोड, अजित पवार, राहुल राठोड, दयानंद जाधव, अरुण जाधव यांची निवड करण्यात आली.

यावेळी धुरगुडे म्हणाले की, मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचे कुठलेही काम, शैक्षणिक, दवाखान्याची कामे असू द्या, मला कधी ही फोन करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. या जबाबदारीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर आहे. शाखा ही फटाके, हलगी वाजवण्यापूर्ती मर्यादित न ठेवता पूर्ण वेळ काम करत शासनाच्या मिळणाऱ्या योजना सामान्यांपर्यंत  पोहचविण्याचे काम शाखेच्या माध्यमातून करण्यात यावे असे आवाहन त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा धुरगुडे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, युवक जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय शहराध्यक्ष डी.के. कांबळे, अंबेजवळगा जि.प.गटप्रमुख सुरेश राठोड, केशेगाव जि. प. गटप्रमुख लिंबराज लोखंडे, विद्यार्थी तालुका सचिव सागर गाढवे, धनराज मस्के, ग्रामपंचायत सदस्य तेर अमोल कसबे, रमाकांत मोरे, विश्वनाथ बागल, विठ्ठल बागल, सखाराम जाधव, देविदास राठोड, वसंत राठोड, सचिन शिंदे, संजय जाधव, गणपत राठोड, माणिक राठोड, उल्हास राठोड, विकास राठोड, बबन राठोड, धनाजी राठोड, राजाराम राठोड, सुरेश राठोड, जालिंदर जाधव, समाधान जाधव, नितीन राठोड, नामदेव राठोड, सुनील शिंदे, सतीश राठोड, नामदेव राठोड, पप्पू पवार, नितीन राठोड, बुबा पवार, टोपाजी जाधव, तुकाराम जाधव, शहाजी राठोड, सखाराम राठोड, रामा जाधव, माणिक पवार, बाबुराव जाधव, अमोल शिंदे, बिटू थोरात यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !