अखिल भारतीय समता परिषदेचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे - सुभाष राऊत


अखिल भारतीय समता परिषदेचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे - सुभाष राऊत

धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - बहुजनांचे नेते छगनराव भुजबळ यांचे हात मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय समता परिषदेचे संघटन मजबूत करावे. त्यासाठी समता सैनिकांनी गाव तेथे शाखा स्थापन करून जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राऊत यांनी दि.५ सप्टेंबर रोजी केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक शहरातील मेघमल्हार हॉटेलच्या सभागृहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य प्रचारक प्रा.डॉ.नागेश गवळी, पश्चिम मराठवाडा विभागीय अध्यक्ष आबासाहेब खोत, संतोष भाकरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे काम छगनराव भुजबळ यांनी केले. ओबीसी महामंडळाची स्थापना, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यृवत्ती अशी कामे मोठ्या ताकदीने त्यांनी केली. राजकीय महत्त्वाकांक्षा बाजुला सारून भुजबळ यांनी बहुजन समाजाचा विचार कायम राखल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेश प्रचारक प्रा.डॉ.गवळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पश्चिम मराठवाडा विभागीय अध्यक्ष आबासाहेब खोत यांनी तर सूत्रसंचालन राहुल बनसोडे यांनी व आभार रॉबिन बगाडे यांनी मानले. या बैठकीसाठी बिभीषण खुणे, संतोष डोरले, प्रशांत वेदपाठक, संतोष भाकरे, प्रदीप राऊत, महादेव लोकरे, आशिष माने, अजय देवकुळे, भजनदास जगताप, रणजित डोंगरे, हनुमंत पंडित यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !