फिजिओ थेरपी येथे फिजिओ थेरपी दिवस उत्साहात साजरा

फिजिओ थेरपी येथे फिजिओ थेरपी दिवस उत्साहात साजरा

धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - जगभरामध्ये ८ सप्टेंबर हा दिवस जागतिक फिजिओ थेरपी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे ही फिजिओ थेरपी दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नागरिकांना फिजिओथेरपीचे महत्व तसेच फिजिओ थेरपीच्या उपचाराने कोणते इलाज केले जातात ? हे समजून सांगण्यासाठी शैक्षणिक संकुलात आरोग्य विषयक जनजागृती रॅली व फिजिओ थेरपीचे महत्व हे लघुनाट्य सादर केले.

यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.उमादेवी पवाडशेट्टी, डॉ.कोमल ठाकूर, डॉ.पूजा आचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जागतिक फिजिओ थेरपी दिनानिमित्त धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, एस.बी.एन.एम. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरज ननवरे, आर.पी.डी फार्मसी कॉलेजचे विभाग प्रमुख सुबोध कांबळे, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अमर कवडे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओ थेरपीच्या सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !