रोटरी क्लबच्या राष्ट्र निर्माता पुरस्काराचे वितरण
रोटरी क्लबच्या राष्ट्र निर्माता पुरस्काराचे वितरण
धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब उस्मानाबादच्या शवतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्र निर्माता पुरस्कार २०२३-२४ चे वितरण रोटरी नेत्र रुग्णालयात दि.८ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
हा पुरस्कार भाई उद्धवराव पाटील प्रशाला, जि.प. प्रशाला सांजा, शम्स उलुम उर्दू प्रशाला व आर्य चाणक्य विद्यालय या शाळांमधील शिक्षकांना जाहीर झाला आहे. यामध्ये एस.जु. गायकवाड, एस.एम. तनमोर, पी.एल. माळी, ए.ए. शेख या
उत्कृष्ट शिक्षकांची निवड करताना शाळेतील प्रत्येकी १० विद्यार्थी व मुख्याध्यापक यांना प्रश्नावली देऊन ती भरून घेण्यात आली. त्यातील गुणांकनाच्या आधारे उत्कृष्ट शिक्षकांची निवड करून राष्ट्र निर्माता पुरस्कार' सपत्नीक २०२३-२४ देण्यात आले. यावेळी सर्व सत्कारार्थी व मुख्याध्यापक डॉ मनीष देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ अनार रवींद्र साळुंके तर प्रमुख पाहुणे म्हणून शम्स उलुम उर्दू प्रशालेचे मुख्याध्यापक सादत, भाई उद्धवराव पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक पडवळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमास रोटरी क्लबचे सदस्य, माजी प्रांतपाल रवींद्र साळुंके, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार रोटरी क्लबच्या सचिव डॉ मीना श्रीराम जिंतूरकर यांनी मानले.